प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी यंदा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन मुख्य अतिथी आहेत. हा प्रजासत्ताक दिन महिलांसाठी ऐतिहासिक आहे. या प्रजासत्ताक दिनी परेडच्या केंद्रस्थानी महिला आहेत. यावेळी तिन्ही सैन्यदलातील एक महिला तुकडी परेड करणार आहे. यात लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन शरण्या राव करत आहेत. तसेच, फ्रान्सची एक तुकडीही यावेळी परेड करणार असून एका बँडदलाचेही भारतात आगमन झाले आहे. यात सहा भारतीय सैनिकही आहेत.
यंदाच्या परेडचे वैशिष्ट्य
महिलाकेंद्रित संकल्पनेवर आधारित प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदा महिलांची त्रिसेवा तुकडी कर्तव्यपथावर परेड करेल. त्यात लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन शरण्या राव करणार आहे. शरण्या सध्या लेफ्टनंटपदावर कार्यरत आहेत. ती कर्नाटकच्या कोजालू जिल्ह्याची रहिवासी असून तिच्या वडिलांचे नाव मैथिली राव आहे. शरण्या राव हिने बीईची पदवी मिळवली आहे. तिने कर्नाटकच्या पोन्नामपटस्थित कुर्ग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शरण्या हिची २० नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय लष्करात नियुक्ती करण्यात आली होती. चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधील तांत्रिक शाखेत लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ‘लष्करी तुकडीचे नेतृत्व पहिल्यांदाच महिला करणार असल्याने हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यासाठी माझी निवड झाल्याने मला या गोष्टीचा अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया शरण्या हिने दिली आहे.
फ्रान्समधील लष्करात भारतीय कसे?
फ्रान्समध्ये परदेशी लष्कराची एक तुकडी असते, जिचे नाव ‘फ्रेंच फॉरेन लिजन’ असे आहे. १८३१मध्ये स्थापना झालेल्या ‘फ्रेंच फॉरेन लिजन’ला फ्रेंच लष्कराचा अविभाज्य भाग मानला जातो. या दलात परदेशी सैनिकांना काही अटीशर्तींनुसार फ्रान्सच्या सैन्यदलासोबत काम करण्याची संधी मिळते. यात सद्यस्थितीत साडेनऊ हजार अधिकारी आणि कॅप्टन आहेत. या दलात जगभरातील १४० देशांमधील सैनिकांचा समावेश आहे.
हे ही वाचा..
जम्मू-काश्मीर: प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी!
आयसीसी पुरस्कार:विराट कोहली बनला ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’!
महाराष्ट्रातील मंत्र्यांचा अयोध्या दौरा लांबणीवर ?
फ्रान्सच्या लष्कराची परेड
प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या परेडमध्ये फ्रान्सची ९५ सदस्यीय मार्चिंग टीम आणि ३३ सदस्यांचे बँडपथक सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानासह एक मल्टीरोल टँकर ट्रान्सपोर्ट विमान आणि फ्रान्सच्या हवाई दल सेनेचे राफेल लढाऊ जेट विमानेही उड्डाणात सहभागी होतील. तसेच, सीसीएच सुजन पाठक (हेड कॉर्पोरेल), सीपीएल दीपक आर्य (कॉर्पोरेल), सीपीएल परबीन टंडन (कॉर्पोरेल), गुरवचन सिंह (फर्स्ट क्लास लीजियोनेयर), अनिकेत घर्तिमागर (फर्स्ट क्लास लीजियोनेयर) आणि विकास डीजेसेगर (फर्स्ट क्लास लीजियोनेयर) सहभागी होणार आहेत.