भारतीय जनता युवा मोर्चाकडून ‘नमो नवमतदाता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जानेवारी रोजी नवीन मतदारांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील युवा वर्गाशी संवाद साधला. दरम्यान, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी एकत्र बसून ऐकावा यासाठी कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मालाड येथे जमण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
‘नमो नवमतदाता’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्याची संधी आमदार अतुल भातखळकर यांनी तरुणांना उपलब्ध करून दिली होती. मालाड पूर्व येथील पारेख हॉलमध्ये अतुल भातखळकर यांनी विद्यार्थी आणि तरुणांसोबत हा कार्यक्रम ऐकला. ‘नमो नवमतदार’ संमेलनादरम्यान तरुण मतदारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही सर्वजण आता लोकशाही व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग झाला आहात कारण तुमची नावे मतदार यादीत नोंदवली गेली आहेत. आपल्या सर्वांची नावे मतदार यादीत अशा वेळी नोंदवली गेली आहेत जेव्हा देश ‘अमृत काल’मधून जात आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. आमची गती, दिशा, दृष्टी तुम्ही सर्वजण ठरवणार आहात,” असं म्हणत नरेंद्र मोदींनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांना संबोधित करून राष्ट्र उभारणीतील त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली.
हे ही वाचा:
जागावाटपावर एकमत झाले नाही, तर ‘इंडिया’ आघाडीचे खरे नाही
कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!
DGCA ने एअर इंडियाला ठोठावला १.१० कोटींचा दंड!
ममता दीदीनंतर पंजाबचा सूर बदलला, पंजाबमधून आप- १३ जागांवर एकटाच लढणार!
अतुल भातखळकर यांनी केलेल्या आवाहनाला महाविद्यालयीन तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. १८ ते २५ वयोगटातील उपस्थित नवीन मतदारांनी सांगितले की, “नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मतदान करतानाचे विचार अगदीच स्पष्ट झाले आहेत. देशाच्या भविष्याची जबाबदारी आपल्यावर असणार आहे याची जाणीव नरेंद्र मोदी यांनी करून दिली,” अशा भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. याशिवाय नरेंद्र मोदी यांचे हे मार्गदर्शन ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आमदार अतुल भातखळकर यांचे आभारही मानले.