26 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जयपूरमध्ये दाखल

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जयपूरमध्ये दाखल

Google News Follow

Related

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे त्यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याचा एक भाग म्हणून गुरुवारी जयपूरमध्ये दाखल झाले. यावर्षी ते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असल्याने मॅक्रॉन हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. जयपूर विमानतळावर आज दुपारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहर दौऱ्यावर आहेत. हा दौरा आटोपून ते जयपूरला जाणार आहेत. आमेर किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ते जंतर-मंतरवर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. जंतरमंतर हे सवाई जयसिंग यांनी बांधलेल्या १९ खगोलशास्त्रीय उपकरणांचा संग्रह आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन हे जंतरमंतर ते सांगणेरी गेट असा संयुक्त रोड शो करणार आहेत. त्यानंतर ते हवा महल येथे थांबणार आहेत.  हवा महल येथे फोटो काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा..

अभिनेत्री रेवती म्हणाली, ‘आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत, हे पहिल्यांदाच मोठ्याने बोललो’

राम मंदिर अभिषेक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड!

भारताकडून कॅनडामधील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न; कॅनडाचा नवा मुद्दा

भरधाव ट्रकची ऑटो रिक्षाला धडक, १२ जणांचा मृत्यू!

 

पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन दोघेही या भेटीदरम्यान हस्तकला दुकान आणि चहाच्या दुकानाला भेट देण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्ही नेते ऐतिहासिक अल्बर्ट हॉल संग्रहालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर दिवसाची सांगता रामबाग पॅलेसमध्ये होणार आहे. त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीच्या जेवणाचे नियोजन केले आहे. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीला रवाना होतील.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा