23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषप्रभू रामांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीनंतर पांढऱ्या रंगाच्या मूर्तीची पहिली झलक!

प्रभू रामांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीनंतर पांढऱ्या रंगाच्या मूर्तीची पहिली झलक!

उर्वरित दोन्ही मूर्ती मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर बसविण्यात येणार

Google News Follow

Related

अयोध्येत प्रभू रामाच्या बालस्वरूपाच्या मूर्तीच्या अभिषेकनंतर आता आणखी एक प्रभू रामाची मूर्ती समोर आली आहे. पांढऱ्या रंगात दिसणारी ही मूर्ती मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बसवता येणार आहे. या मूर्तीचे शिल्पकार सत्य नारायण पांडे यांनी केले आहे. वास्तविक, राम मंदिराच्या गाभार्‍यात तीन मूर्ती बसवण्‍यासाठी बनवण्‍यात आल्‍या होत्या त्यापैकी अरुण योगीराज यांनी बनविलेल्या मूर्तीची निवड करण्यात आणि आणि याच मूर्तीचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते अभिषेककरून राम मंदिरात विराजमान झाली.

राम मंदिराच्या गाभार्‍यात बसवण्यासाठी तीन मूर्तींची निवड करण्यात आली होती.उर्वरित दोन मूर्ती मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पहिल्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावर बसविण्यात येणार आहेत.अशी माहिती राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली होती.दरम्यान, उर्वरित दोन मूर्तींपैकी आज एका मूर्तीचे छायाचित्र समोर आले आहे.पांढऱ्या रंगात असलेली प्रभू रामांची मूर्ती आहे. ही मूर्ती निवड करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.ही मूर्ती शिल्पकार सत्य नारायण पांडे यांनी बनविलेली आहे.तसेच तिसऱ्या मूर्तीलाही मंदिरात स्थान दिले जाणार आहे. तिसर्‍या मजल्यावर बसवल्या जाणार्‍या मूर्तीचे चित्र अद्याप समोर आलेले नाही. कर्नाटकचे कारागीर गणेश भट्ट यांनी ती मूर्ती बनविलेली आहे.

हे ही वाचा:

मीरारोडमध्ये फडणवीसांनी बांबू दिला!

श्री रामभक्‍तांसाठी बनवलेल्या ‘हलवा’ची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीतून वगळलेल्या सात खेळांचा पुन्हा समावेश करा

आसाम: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवर पोलिसांचा लाठीमार!

पांढऱ्या दगडात बनविलेल्या मूर्तीचे वैशिष्ट्य
या नवीन मूर्तीमध्ये प्रभू रामाचे बालस्वरूपही चित्रित करण्यात आले आहे. अनेक देवी-देवतांना मूर्तीमध्ये स्थान देण्यात आले आहे. भगवान रामाच्या पायांच्या उजव्या बाजूला भगवान हनुमान, भगवान परशुराम आणि त्यांच्या मुकुटाजवळ गौतम बुद्ध यांच्यासह इतर देवता देखील उपस्थित आहेत. या नवीन मूर्तीमध्येही प्रभू रामाला सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा