24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामाश्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार

श्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कठोर कारवाई करणार

Google News Follow

Related

मिरारोड येथे २२ जानेवारीच्या रात्री झालेल्या दंगलसदृश घटनेत २२ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यासंदर्भात आणखी जे आरोपी तोडफोड, गाड्यांचे नुकसान, शस्त्रांचा वापर करणारे म्हणून सीसीटीव्हीत आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, यासंदर्भात १३ आरोपीना अटक केलेली आहे. सीसीटीव्हीमध्ये जे जे लोक दिसत आहेत, दंगा करताना त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल.

सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात भगवे वातावरण होते. विविध ठिकाणी मिरवणुका काढून लोकांनी हा दिवस उत्स्फूर्तपणे साजरा केला. अशाच एका रॅलीवर काही लोकांनी आक्रमण केल्याची घटना मिरारोड, नयानगर येथे घडली.

रविवारी मिरारोडच्या नयानगर भागात दोन समाजात झालेल्या वादामुळे सोमवारी मिरा भाईंदर शहरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हजारो पोलीस अंमलदार, अधिकारी कर्मचारी रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे .एस.आर.पी.एफ.पथक,दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले. सोमवारी रात्री काही तरुणांनी राडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मिरारोडच्या नयानगरला जाणारे सर्व रस्ते बंद केले असून पोलिस तैनात होते त्यामुळे हा वाद चिघळला नाही. मंगळवारी नेहमी प्रमाणे शहर धावताना दिसत आहे. सद्यस्थितीत शांतता असून आज सायंकाळी पाच वाजता भाजपचे आमदार नितेश राणे शहराला भेट देणार आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलने केला विक्रम!

पीएम केअर्स फंडची माहिती उघड करण्याचे निर्देश देणारा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाकडून रद्द!

एआयने केली कमाल आणि रामलल्ला करू लागले स्मितहास्य

एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा

पनवेल येथेही अशाच प्रकारचा हल्ला एका रॅलीवर करण्यात आला. त्यात तलवारीचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यात दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर वार करण्यात आले होते. एकाच्या पाठीला तर एकाच्या डोक्याला मार लागला होता.

चित्रा वाघ पीडितेच्या भेटीला

रविवारी मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यात भाईंदर पश्चिम येथे राहणारी एक महिला देखील जखमी झाली होती.त्यामुळे या महिलेची भेट घेण्यासाठी भाजप महिला प्रदेश नेत्या चित्रा वाघ या माजी आमदार नरेंद्र मेहतासोबत पीडितेच्या घरी गेल्या होत्या.यावेळी त्यांनी महिलेची विचारपूस करून दोषींवर कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल, असे आश्वासन दिले.

 

मीरा भाईंदर मध्ये दिवसभर तणावाचे वातावरण असताना रविवारी झालेल्या घटनेची सोमवारी सांयकाळी पुनरावृत्ती झाली रात्रीच्या दगडफेकीच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर पसरत होत्या. सायंकाळी नया नगर परिसरात पुन्हा मिरवणूकीवर एका गटाकडून दगडफेक करण्यात आली. शेकडोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले होते. मिरा रोड येथील नया नगर भागात झालेल्या वादानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून तेथून मिरवणूक काढण्यास सक्त मनाई केली.

मात्र नया नगर भागात जाण्यासाठी गोल्डन चौकात जमलेल्या जमावाने संतप्त होऊन जवळील टेम्पो नाक्यावर तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाची तोडफोड केली.यामुळे वाहन मालकांचे मोठे नुकसान झाले, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून बंदोबस्तात वाढ केली. पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे हे जातीने घटनास्थळी हजर होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत होते. नागरिकांनी संयम बाळगावा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी केले.
दरम्यान मंगळवारी नया नगर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीसांची अधिक कुमक मागविण्यात आले असून शीघ्र कृती दलाचे प्लटुन, राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहे.

या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, सीसीटीव्ही तसेच व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून हल्लेखोराची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे. व नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा