पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडल्यानंतर ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजने’चा एक भाग म्हणून केंद्र सरकार देशभरातील एक कोटी घरांवर सौरयंत्रणा बसवणार असल्याची घोषणा केली. एक कोटी घरांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या योजनेचा आढावा घेणाऱ्या बैठकीची छायाचित्रे सोमवारी मोदी यांनी ‘एक्स’वर प्रसिद्ध केली.
‘जगातील तमाम भक्तांना सूर्यवंशी प्रभू श्री रामाकडून नेहमीच ऊर्जा मिळते. त्यामुळे भारतातील नागरिकांच्या घरांच्या छतावर स्वतःची सौरऊर्जा यंत्रणा असावी, या माझ्या संकल्पाला आज अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेप्रसंगी अधिक बळ मिळाले,’ असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे आमचे सरकार एक कोटी घरांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे,’ असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या निर्णयामुळे एक कोटी घरांवर सौरऊर्जा बसविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीजबिल केवळ शुन्यावर येणार नाही. तर, हे पाऊल भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवेल.
हे ही वाचा:
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या
मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!
पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत
अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्याचे अध्यक्षपद पंतप्रधान मोदींनी भूषवल्यानंतर काही तासांनी ही घोषणा केली. विधी संपल्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. राम हा अग्नी नसून ऊर्जा आहे, राम हा वाद नाही तर समाधान आहे. राम केवळ आपला नाही, सर्वांचा आहे आणि राम केवळ वर्तमानच नाही तर शाश्वतही आहे,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राम मंदिर भारतीय समाजातील शांतता, संयम, सौहार्दाचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.