प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामलल्लाची मूर्ती सुवर्णालंकाराने झळाळून गेली होती. रामलल्लाचे हे कोट्यवधी किमतीचे दागिने घडवण्यासाठी सुमारे १३२ सुवर्णकलाकार दिवस-रात्र झटत होते.रामलल्लाने धनुष्यबाणासह मुकुट, तिलक, मौल्यवान खड्यांची अंगठी, छोटा हार, पंचलंडा हार, विजयमाला, कंबरपट्टा आणि बाजूबंद, बांगडी, पायातील कडे, सोन्याचे पैंजण असे दागिने परिधान केले होते. हे सर्व दागिने सुमारे १८ हजार ५६७ हिरे, दोन हजार ९८५ माणके, ६१५ मौल्यवान खडे आणि ४३९ हिऱ्यांनी मढवले आहेत.
हिरेमाणकांनी सजलेल्या रामलल्लाच्या सुवर्णमुकुटाचे वजन सुमारे १.७ किलो आहे. यात सुमारे ७५ कॅरेट हिरे, १३५ कॅरेटचे झाम्बियान खडे आणि २६२ कॅरेटच्या माणकांसह अन्य मौल्यवान खड्यांचा समावेश आहे.लखनऊतील हर्शाईमाल शियामल ज्वेलर्सचे सीईओ अंकुर यांनी या सर्व दागिन्यांचे डिझाईन केले असून त्यांनीच ते घडवलेही आहेत. हे दागिने घडवण्यासाठी त्यांनी हिंदू धर्मग्रंथे आणि रामायण मालिकेकडून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. ‘मुकुट हा श्रीराम लल्लाच्या सर्वांत सुंदर अशा आभूषणांपैकी एक आहे. या मुकुटाच्या मध्यभागी सूर्याचे चिन्ह आहे. जे श्री रामलल्लाच्या सूर्यवंशी घराण्याचे द्योतक आहे.
हे ही वाचा:
पीएम केअर्स फंडची माहिती उघड करण्याचे निर्देश देणारा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाकडून रद्द!
एआयने केली कमाल आणि रामलल्ला करू लागले स्मितहास्य
येमेनमधील हौथी तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हवाईहल्ले!
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या
तर, राष्ट्रीय पक्षी असेलले मोर हे चिन्ह राजघराण्याची निशाणी राहिले आहे. तर, माणके व मौल्यवान खडे हे सूर्यदेवाचे प्रतीक मानले जातात. तर, नैसर्गिक हे हे शुद्धता आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहेत,’ असे आनंद यांनी सांगितले. तर, शारीरिक हानीपासून भक्तांचे संरक्षण करणारे तिलक या आभूषणाच्या मध्यभागी तीन कॅरेटचा हिरा असून त्याच्या भोवताली लहान हिरे आणि माणिक आहेत. ते अशाप्रकारे मढवण्यात आले आहेत की, सकाळी सूर्याची पहिली किरणे या तिलकावर पडतील. ही सूचना आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, असे आनंद यांनी सांगितले.
आनंद यांची कंपनी गेल्या १३० वर्षांपासून विविध मंदिरांचे दागिने घडवते. यात वृंदावन, बरेली, बदाऊन आणि अलिगडमधील दागिन्यांचा समावेश आहे. इंटरनॅशनल जिमेलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) यांनी प्रमाणित केलेले सर्वोत्तम गुणवत्तेचे हिरे यात वापरण्यात आले आहेत. श्री राम लल्ला यांचा दागिन्यांचा संग्रह भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतो आणि भारतीय सराफांच्या कलात्मकतेचे आणि कारागिरीचे एक अपवादात्मक प्रदर्शन आहे, असेही ते म्हणाले.