मीरारोड येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित रॅली दरम्यान मुस्लिम बहुल भागात दगडफेक आणि गाड्या फोडण्याच्या तसेच महिला व मुलांना मारहाण केल्याच्या घटना घडल्यानंतर पनवेल येथेही अशीच घटना घडली. या घटनांमुळे हिंदू धर्मीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या या भागात काढण्यात आलेल्या श्रीराम शोभा यात्रेत दगडफेक तसेच हत्यारांनी हल्ले करण्याची घटना घडली. त्यात दोन जण जखमी आहेत.
पनवेलमध्ये शिवसेनेच्या रुपेश शिंदे यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन केले होते. त्याचदरम्यान हा हल्ला झाला. खारघरहून पनवेलला ही बाईक रॅली जात असताना हा हल्ला झाला. त्यात तिघे जखमी आहेत. त्यांच्या डोके, हात यावर वार झाल्याच्या जखमा आहेत.
या हल्ल्यादरम्यान इनोव्हा, फॉर्च्युनर गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.
हे ही वाचा:
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भक्ताला हृदयविकाराचा आला झटका!
हिंदुस्तान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला…
राम मंदिराच्या उदघाटनावेळी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक!
मुस्लिमांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह हिंदूंच्या ताब्यात द्यावी!
चिन्मय सलोनी आणि संदीप ठाकूर अशी त्यांची नावे आहेत. एकाच्या डोक्यावर तर एकाच्या पाठीवर वार झाले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यावर त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह ५०-६० कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले. सदर हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
खारघरहून पनवेलला ही बाईक रॅली जात असताना हा हल्ला झाला. त्यात तिघे जखमी आहेत. त्यांच्या डोके, हात यावर वार झाल्याच्या जखमा आहेत.या हल्ल्यादरम्यान इनोव्हा, फॉर्च्युनर गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.
त्याआधी मीरारोड येथेही मुस्लिम बहुल भागात राममंदिर रॅलीवर हल्ला झाला. त्यात आतापर्यंत २२ लोकांना अटक करण्यात आलेली आहे.
त्याआधी मीरारोड येथेही मुस्लिम बहुल भागात राममंदिर रॅलीवर हल्ला झाला. त्यात आतापर्यंत २२ लोकांना अटक करण्यात आलेली आहे.