अयोध्येच्या राम मंदिरात सोमवारी पार पडलेल्या प्रभू राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमादरम्यान एका भक्ताला हृदयविकाराचा झटका आला.परंतु भारतीय हवाई दलाच्या पथकाने त्याला वेळीच वाचवले.रामकृष्ण श्रीवास्तव (६५)असे भक्ताचे नाव असून मंदिराच्या आवारात हृदयविकाराच्या झटक्याने तो खाली कोसळला.विंग कमांडर मनीष गुप्ता यांची भक्तावर नजर गेली.कमांडर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील भीष्म क्यूबच्या पथकाने घटनेच्या एका मिनिटात बाहेर त्यांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
उपचारादरम्यान असे आढळून आले की, भक्त श्रीवास्तव यांच्या रक्तदाबाची पातळी वाढल्याने ते जमिनीवर कोसळले.रॅपिड रिस्पॉन्स टीमने त्यांना साईटवर प्रथमोपचार प्रदान केले.मिळालेल्या माहितीनुसार, भक्ताची प्रकृती स्थिर असून त्याला पुढील निरीक्षणासाठी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!
श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि शिवराज्याभिषेक… तोच उत्साह, तोच आनंद!
राम मंदिराच्या उदघाटनावेळी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक!
मोदींकडून कामगारांवर पुष्पवर्षाव!
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज प्रभू रामांचा अभिषेक सोहळा पार पडला.अनेक धार्मिक विधीनुसार हा सोहळा पार पडला.देशभरातील भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत उपस्थित होते.तसेच देशभरातील नामांकित, प्रतिष्ठित लोकांनी सोहळ्याला उपस्थिती लावली.संपूर्ण देश आज राममय झाला.देशभरातील रामभक्तांकडून ठिकठिकाणी कलश यात्रा काढण्यात येत आहे.सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात येत आहे.देशासह संपूर्ण जगाचे या सोहळ्याकडे लक्ष लागून होते.आज २२ जानेवारी रोजी ८४ सेकंदाच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान मोदींनी राम लल्लाला अभिषेक केला.तब्बल ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला आपल्या मंदिरात विराजमान झाल्याने देशातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.