भारताच्या सुवर्ण इतिहासात २२ जानेवारीच्या तारीख अजरामर झाली आहे.५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रामलल्ला आपल्या मंदिरात विराजमान झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांचा अभिषेक सोहळा पार पडला.आज अयोद्या नाहीतर संपूर्ण देश राममय झाला आहे.तर दुसरीकडे या शुभमुहूर्तावर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.अयोध्या राम मंदिराच्या चित्रावर पाकिस्तानी झेंडे फडकावल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे आक्षेपार्ह चित्र सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कर्नाटकातील गदग जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले.व्हायरल फेसबुक पोस्टमध्ये राम मंदिराच्या वर पाकिस्तानी झेंडे दिसत असून खाली ‘बाबरी मशीद’ असे लिहिले आहे.नवनिर्माण झालेल्या राम मंदिराच्या फोटोला एडिट करून जातीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे ही वाचा:
मोदींकडून कामगारांवर पुष्पवर्षाव!
पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत
पाकिस्तानातही राम प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष
मुस्लिमांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह हिंदूंच्या ताब्यात द्यावी!
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर गदग येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.ताजुद्दिन दफेदार असे अटक करण्यात आल्याचे नाव आहे.पोलिसांनी आरोपीला त्याच्या सोशल मीडियावरून वादग्रस्त पोस्ट हटवायला लावल्या आहेत.
या प्रकरणी गदगचे पोलीस अधीक्षक बाबासाहेब नेमगौड म्हणाले की, आरोपी हा गदगचा स्थानिक रहिवासी आहे.आम्ही त्याला अटक केली आहे.त्याचा कोणत्या घटनेशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, फेसबुकवर ती पोस्ट पाहिली आणि चुकून पुढे शेअर केली.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.