आज अयोध्येत सुमारे ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली.मंत्रोच्चार आणि शंख फुंकत पंतप्रधान मोदींनी राम लल्लाला अभिषेक केला.भगवान रामलला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान आहेत. ८४ सेकंदाच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान मोदींनी राम लल्लाला अभिषेक केला. प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर रामललाचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. या फोटोत रामलला हसताना दिसत आहे. गर्भगृहात रामललाचा अभिषेक संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी २२ जानेवारी सोमवार १२ वाजून २९ मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर प्रभू रामलल्लाला अभिषेक घातला. यानंतर अयोध्यानागरी जय श्री राम-नामाच्या घोषणांनी दुमदुमली.यानंतर राम मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
हे ही वाचा:
राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेमुळे भारत नवी उंची गाठेल
पंतप्रधान मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधले नसते!
उत्तर प्रदेशातील पर्यटन व्यवसाय चार लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता
रामललाच्या पूजेसाठी पंतप्रधान मोदी गर्भगृहात बसले असताना त्यांच्यासोबत आरएसएस प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सीएम योगी यांच्यासह अनेक लोक उपस्थित आहेत.पंतप्रधानां पूजा करताना धोती-कुर्त्यामध्ये दिसले.त्यानंतर शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चार करून रामललाचा अभिषेक विधी संपन्न झाला.
दरम्यान, देशभरात आनंदाचे वातावरण आहे.अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत.प्रभू रामांचा अभिषेक सोहळा पार पडला असून अनेक विधींचा कार्यक्रम पार पडत आहेत.देशभरातील अनेक प्रतिष्ठित दिग्गजांणी सोहळ्याला उपस्थिती लावली.सोहळ्याला उपस्थितांमध्ये अभिनेता चिरंजीवी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सचिन तेंडुलकर, विवेक ओबेरॉय, सोनू निगम, रजनीकांत, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राजकुमार चराणी हिर यांच्यासह अनेक दिग्गज पोहोचले आहेत.