26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियासानिया मिर्झाशी वेगळा झाल्यावर शोएब मलिकचे तिसरे लग्न

सानिया मिर्झाशी वेगळा झाल्यावर शोएब मलिकचे तिसरे लग्न

पाक अभिनेत्री सना जावेदशी निकाह, तीदेखील आहे घटस्फोटित

Google News Follow

Related

पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब मलिक हा पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून त्याने ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री साना जावेदशी त्याने लग्न केलं आहे. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्याशी त्याने लग्न केले होते. मध्यंतरीच्या काळात या दोघांमध्ये आलबेल नसून त्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. आता शोएब मलिक याने पुन्हा लग्न केल्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे.

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या दुसऱ्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे. साना जावेद यांच्याशी विवाहबद्ध झाल्याचं शोएबने म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून शोएब आणि सानिया मिर्झा यांच्यात बेबनाव असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. सानिया मिर्झाने तिच्या अकाऊंटवरून शोएबबरोबरचे फोटो डिलिट केले होते. त्यावरून जोरदार चर्चा झाली होती. मात्र, दोघांनी त्याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर आता शोएबने दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे. शोएब आणि सनाच्या डेटिंगच्या चर्चा आधीपासूनच होत्या.

४१ वर्षीय शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचे २०१० साली हैद्राबादमध्ये मुस्लीम पद्धतीने लग्न झाले होते. हे शोएबचं दुसरं लग्न होतं. त्याआधी शोएब आणि आयेशा सिद्दीकी यांचा घटस्फोट झाला होता. पाकिस्तानच्या खेळाडूशी लग्न करण्यावरून सानिया मिर्झाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नानंतर सानिया-शोएब दुबईत राहत होते.

हे ही वाचा:

राम मंदिराबद्दलची काँग्रेसची भूमिका उदासीन, गुजरातच्या काँग्रेस आमदाराचा राजीनामा

अयोध्येतील सोहळ्याचे ‘त्या’ पाच न्यायाधीशांना निमंत्रण

अमेरिकेचा येमेनमधील हुती दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला

राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रिलायन्स उद्योगाकडून सुट्टी जाहीर

शोएब मलिक हा पाकिस्तानचा माजी कर्णधार असून ३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १२४ टी- २० सामन्यात त्याने पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. जगभरात विविध टी- २० लीगमध्येही शोएब खेळतो. सना जावेद ही पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. तिने २०२० मध्ये उमेर जसवालशी लग्न केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा