२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा अभिषेक होणार आहे.सोहळ्याची तयारी सुरु करण्यात आली असून विविध विधी पार पडत आहेत.मंदिराच्या गर्भगृहात डोळ्यावर पट्टी बांधून प्रभू रामांची मूर्ती ठेवण्यात आली आहे.परंतु अभिषेक करण्यापूर्वी प्रभू रामललल्लाच्या पहिली झलक समोर आली आहे.प्रभू रामांच्या मूर्तीचे चित्र सर्वत्र प्रसिद्ध झाले असून सोहळ्यापूर्वीच भाविकांना दर्शन मिळाले आहे. मात्र, हे चित्र रामलल्लाला गर्भगृहात बसवण्यापूर्वीचे आहे.प्रसिद्ध झालेल्या प्रभू रामांच्या चित्रात चेहऱ्यावर गोड हास्य, कपाळावर टिळक आणि हातात धनुष्यबाण दिसत आहे.
म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली रामलल्लाची ५१ इंची मूर्ती गुरुवारी पहाटे मंदिरात आणण्यात आली.चार तासांच्या धार्मिक विधीनंतर प्रभू रामांच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना करण्यात आली. अभिषेक सोहळ्याशी संबंधित पुजारी अरुण दीक्षित यांनी सांगितले की, दुपारी गर्भगृहात वैदिक मंत्रोच्चारासह प्रभू रामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
हे ही वाचा:
देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!
नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला
मणिपूरमधील हिंसाचारात म्यानमारच्या दहशतवाद्यांचाही सहभाग?
प्रसिद्ध झालेली रामलल्लाची मूर्ती अप्रतिम दिसत आहे.चेहऱ्यावर मनमोहक हास्य, कपाळावर टिळा आणि हातात धनुष्यबाण असलेल्या या मूर्तीमध्ये श्रद्धा आणि अध्यात्माची झलक दिसते. जे राम भक्तांना पहिल्याच नजरेत आकर्षित करत आहे.दरम्यान, अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.सोहळ्याची तयारीही जोरदार सुरु आहे.सोहळ्यापूर्वीच हजारो भाविक अयोध्येला जात आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अभिषेक सोहळा पार पडणार आहे.देशभरात आनंदाचे वातावरण असून भाविक सोहळ्याची आतुरतेने वाट बघत आहेत.