इस्रायलमधील विविध नोकऱ्यांसाठी १०,००० हून अधिक भारतीय बांधकाम कामगारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया हरियाणाच्या रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात सुरू झाली आहे.इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलने मोठ्या संख्येने पॅलेस्टिनींचे वर्क परवाने रद्द केले होते.पॅलेस्टिनींचे वर्क परवाने रद्द केल्यामुळे इस्रायलला तीव्र कामगार टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे ही भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे.
बरेच इस्रायली राखीव सैन्य परत आघाडीवर जात आहेत. गाझा आणि वेस्ट बँकच्या सीमा बंद केल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे इस्रायल सरकारने भारतातून बांधकाम कामगारांना कामावर घेण्याची ऑफर दिली आहे.
या भरतीसाठी अर्ज करणारा कामगार गोविंद सिंग म्हणाला की, “मी या संधीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. नोंदणीनंतर, मी या भरती मोहिमेची वाट पाहत होतो. मी एक गवंडी आहे आणि प्लास्टरच्या कामात तज्ञ आहे. मला आशा आहे की माझे कौशल्य इस्रायली भर्तीकर्त्यांकडून स्वीकारले जाईल,” असे अर्जदार गोविंद सिंग यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मलाही माझ्या लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, पंतप्रधान झाले भावूक!
देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!
नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला
लोखंडी काम, टाइल कटिंग आणि फिटिंग, लाकडी पॅनेल फिटिंग आणि प्लास्टर या अशा विविध पदांच्या रिक्त पदासाठी ही भरती होत आहे. तज्ञांकडून त्यांच्या कौशल्याची तपासणी केल्यानंतरच उमेदवारांना निवडले जाणार आहे.पात्रताधारकांना विशिष्ट ओळख क्रमांक देऊन ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आली आहे.तसेच निवड होईपर्यंत अर्जदारांची ओळख लपवली जाणार आहे, असे भरती मोहिमेत मदत करणाऱ्या व्यवस्थापकाने सांगितले.
दरम्यान, गेल्या वर्षी व्हॉईस ऑफ अमेरिकाच्या एका अहवालात असे म्हटले होते की, इस्रायलच्या बांधकाम क्षेत्राने आपल्या सरकारला सुमारे ९०,००० पॅलेस्टिनींना बदलण्यासाठी भारतातून एक लाख कामगार कामावर घेण्याची परवानगी देण्यास कंपन्यांना सांगितले होते.इस्त्रायल-हमास युद्ध अजूनही सुरु आहे.या युद्धात गाझामध्ये आतापर्यंत २४,६२० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलमध्ये सुमारे १,२०० लोकांनी आपला जीव गमावला आहे.