इराणच्या लष्कराने मंगळवारी पाकिस्तानच्या बलोचमधील कट्टरवादी गट जैश अल-अदलच्या दोन प्रमुख ठिकाणांवर हवाई हल्ले केले. इराक आणि सिरियामध्ये हवाई हल्ल्याच्या एक दिवसानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ला केला. कट्टरवादी गटाच्या दोन प्रमुख तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले.
जैश-अल-अदल या कट्टरवादी गटाचे सर्वांत मोठे मुख्यालय जिथे होते, अशा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील दोन तळांवर हल्ले करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र या अकारण केलेल्या हल्ल्यात दोन निष्पाप मुले मारले गेले तसेच, तीन मुली जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे सांगत पाकिस्तानने याचा गंभीर परिणाम होईल, असा इशारा दिला आहे. दहशतवाद हा सर्व देशांसाठी धोका असला तरी अशाप्रकारे एकतर्फी कारवाई करणे शेजारी राष्ट्रांच्या संबंधांसाठी योग्य नसल्याची भूमिका पाकिस्तानने मांडली आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे द्विराष्ट्रीय संबंध आणि विश्वास कमकुवत होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
जैश-अल-अदल या संघटनेची स्थापना सन २०१२मध्ये झाली होती. ही इराणी दहशतवादी संघटना असल्याचे सांगितले जाते. इराणमधील सिस्तान-बलुचिस्तानमधील हा एक दहशतवादी गट आहे. गेल्या काही वर्षांत या गटाने इराणच्या सुरक्षा दलावर अनेक हल्ले केले आहेत. डिसेंबरमध्ये या संघटनेने सिस्तान-बलुचिस्तानमधील पोलिस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ११ पोलिसांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
माजी सैनिकाची अनोखी रामभक्ती; ७ कोटी वेळा लिहिले ‘श्री राम’
विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट
२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने आम्ही येऊ शकत नाही, कृपया कारवाई करू नये!
एक दिवस आधी इराक-सिरीयावरही हल्ला
एक दिवस आधी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इराकच्या उत्तरेकडील शहर एरिबलजवळ इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेवर क्षेपणास्त्रहल्ला केला. तसेच, सिरियामध्येही इस्लामिक स्टेट्सच्या दहशतवाद्यांवर कारवाई केली. आयएसच्या सभांना नामशेष करण्यासाठीही क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. त्याच चार जणांचा मृत्यू झाला होता.