अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सोहळ्याच्या धार्मिक विधींना मंगळवारपासून सुरुवात झाली असून २१ जानेवारीपर्यंत या विधी चालू असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशातील सर्वच कानाकोपऱ्यातून मंदिरासाठी भेटवस्तू पाठविण्यात येत आहेत. राम भक्तांकडूनदेखील वेगवेगळे उपक्रम केले जात आहेत.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी मधील एका माजी सैनिकाची रामभक्ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. माजी सैनिक मारुती खोत (वय ६६ वर्षे) यांच्या अनोख्या रामभक्तीने सारा देश चकित झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी गावचे ६६ वर्षीय मारुती खोत हे भारतीय सैन्यदलात कामावर होते. तेव्हापासून त्यांनी श्री राम लिहित जप करायला आणि श्री राम नामजपाचे पाठ करायला सुरुवात केली होती. ८ मे १९८१ रोजी खोत यांनी सैन्यात सीमेवर असतानाच मिळेल त्या रजिस्टरमध्ये श्री राम लिहायला सुरुवात केली.
हे ही वाचा:
विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट
२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने आम्ही येऊ शकत नाही, कृपया कारवाई करू नये!
इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी
सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर खोत यांनी अधिक जास्त वेळ नाम जप करायला सुरुवात केली. आजही खोत यांचे लिखाण सुरू आहे. आतापर्यंत एकूण ४२ वर्षांच्या कालावधीमध्ये छोटी, मोठी अशा तब्बल २३५ रजिस्टरमध्ये खोत यांनी श्रीरामाचा जप करत ‘श्री राम श्री राम’ असे लिखाण केले आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास ७ कोटी ८२ लाख 45 हजार ७ इतक्या वेळा आपण श्री राम रजिस्टर वर लिहल्याचा दावा देखील खोत यांनी केला आहे. ही सर्व रजिस्टर आजही खोत यांनी जपून ठेवली आहेत. यानंतर त्यांची रामभक्ती चांगलीच चर्चेत आली आहे.