भारत पॅरिस करारातील आपले वचन पुर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य मार्गांवर आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे दूत जॉन केरी यांना दिला. बुधवारी जॉन केरी आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यावेळी मोदींनी हा विश्वास दिला होता.
पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार “पॅरिस कराराअंतर्गत प्रत्येक राष्ट्राने ठरवलेल्या राष्ट्रीय लक्ष्याच्या पूर्ततेसाठी भारत योग्य मार्गावर असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी दिला. त्याबरोबरच भारत हे काम करत असलेल्या मोजक्या राष्ट्रांपैकी एक असल्याचे देखील सांगितले.”
हे ही वाचा:
मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरवात
एमपीएसी परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मागणी
केरी यांच्या भारतभेटीची सांगता काल झाली. या दौऱ्या दरम्यान ते अनेक नेत्यांची आणि पंतप्रधानांची भेट घेतली. त्याबरोबरच त्यांनी अनेक सामाजिक संस्थांची देखील भेट घेतली.
या बैठकी दरम्यान केरी यांनी अमेरिका भारताला हवामानाबाबतच्या धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करेलच परंतु हरित तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील मदत करेल. त्याबरोबरच त्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देखील करेल असे सांगितले.
या बाबत नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले होते. ते म्हणतात, “आपल्या ग्रहाला वाचवण्यासाठी अजेंडा २०३०च्या हरित आणि स्वच्छ तंत्रज्ञानावर आपण, भारत आणि अमेरिका एकत्र काम करू शकतो.”
With our complementary strengths, India and US can creatively collaborate on a 2030 agenda for clean and green technologies in the service of the planet. @JohnKerry
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2021
२२ आणि २३ एप्रिल रोजी सर्व नेत्यांची वातावरण परिषद होणार आहे. या परिषदेपूर्वी जॉन केरी हे भारतभेटीवर आले होते.