24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनिया‘आम्हाला गाझामध्ये कोणीही रोखू शकत नाही’

‘आम्हाला गाझामध्ये कोणीही रोखू शकत नाही’

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा विजय मिळवण्याचा निर्धार

Google News Follow

Related

गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांविरोधातील युद्धात विजय मिळण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मग ते हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालय असो किंवा शत्रू. विजय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढणे गरजेचे आहे आणि आम्ही तेच करणार, असा निर्धार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शनिवारी व्यक्त केला.

रविवारी इस्रायलने हमासविरोधात पुकारलेल्या युद्धाने १००व्या दिवसात पदार्पण केल्यानंतर नेतान्याहू यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्धार व्यक्त केला.

नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याबाबतही भाष्य केले. इस्रायलने संयुक्त राष्ट्राच्या नरसंहार रोखण्याच्या कराराचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत नेतान्याहू यांनी गाझामधील लष्करी कारवाईत हमासच्या बहुतेक दहशतवाद्यांचा निःपात झाल्याचा दावा केला आहे. मात्र तरीही उत्तर गाझामधून ज्यांना आपले राहते घर सोडावे लागले आहे, ते इतक्यात तरी परतण्याची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा..

मालदीवने भारताला पुन्हा डिवचले; भारतीय सैन्य माघारी बोलाविण्यासाठी दिला अल्टिमेटम

दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही

लोखंडवाला १२० फुटी डीपी रोडसाठी मुख्यमंत्री सकारात्मक

संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर

‘आंतरराष्ट्रीय कायद्यात एक साधी सरळ गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे. तुम्ही अशा युद्धग्रस्त जागेतून लोकांना बाहेर काढता. मात्र जोपर्यंत धोका पूर्णपणे टळत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना परत येण्याची मुभा देत नाही. आणि धोका अजूनही पुरता टळलेला नाही. उत्तर गाझामध्ये अजूनही लढा सुरूच आहे,’ असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे इतक्यात तरी इस्रायलचे लष्कर गाझा पट्टीमधून सैन्य माघार घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नेतान्याहू यांच्या निर्धारामुळे आता हे युद्ध आणखी काही दिवस चालणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा