अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ खास आणि निवडक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.या प्रमुख पाहुण्यांमध्ये छत्तीसगडमधील एका वृद्ध महिलेचाही समावेश करण्यात आला आहे.ही वृद्ध महिला भंगार, रद्दी गोळा करून आपला उदरनिर्वाह करते.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळालेली भाग्यवान महिला छत्तीसगडमधील गरियाबंद येथील रहिवासी आहे.बिदुला देवी असे या महिलेचे नाव असून त्या ८५ वर्षांच्या आहेत.त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते आणि वृध्दापकाळातही त्यांना उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर भंगार गोळा करावे लागले. भगवान राम पती त्यांची श्रद्धा पाहता त्यांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
२०२१ च्या सुमारास राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून देणग्या गोळा केल्या जात होत्या.विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि कार्यक्रते छत्तीसगडमधील गरियाबंदयेथे लोकांकडून देणगी गोळा करण्यासाठी निघाले होते.तेवढ्यात ८५ वर्षीय बिदुला देवी यांची नजर त्यांच्यावर पडली.राम मंदिरासाठी देणगी जमा होत असल्याचे समजताच त्यांनी त्या दिवशीच्या एकूण ४० रुपयांच्या कमाईपैकी २० रुपये मंदिराला देणगी स्वरूपात दिली.
हे ही वाचा:
पंतप्रधानांनी रामकुंडावर केला भारताला राष्ट्रगुरू करण्याचा संकल्प
वर्षभरात अयोध्येत ३१ कोटी पर्यटक, प्राणप्रतिष्ठेनंतर महापूर!
‘न्यायालयाचा आदेश सहन करू शकत नाही’… मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठचे पत्र
जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना
गरियाबंद जिल्या विहिंपचे अध्यक्ष शिशुपाल सिंह राजपूत यांनी ही रक्कम स्वीकारली आणि म्हणाले की, ‘सर्वात लहान पण सर्वात मोठी ही रक्कम आहे’, असे शिशुपाल म्हणाले.विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांच्या एका बैठकीत वृद्ध महिलेची गोष्ट सांगितली.
त्यानंतर विहिंपचे राज्य प्रमुख चंद्रशेखर वर्मा यांनी बिदुला देवी यांना सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे.मात्र, दुर्दैवाने ८५ वर्षीय बिदुला देवी या आजारी असल्याने सोहळ्याला जाऊ शकणार नाहीयेत.परंतु आजारातून बाहेर राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला नक्की जाणार असल्याचे बिदुला देवी यांनी सांगितले.