पश्चिम बंगालच्या संदेशखाली परिसरात गेल्या शुक्रवारी ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर तृणमूल नेता शाहजहा शेख फरार आहेत. तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. मात्र घटनेला पाच दिवस उलटूनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
या दरम्यान प्राप्तीकर विभागानेही शेख यांच्या संपत्तीबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजहांपर्यंत पोहोचण्यासाठी ईडीला सहकार्य करण्याकरिता सीमा सुरक्षा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएही मैदानात उतरली आहे. शाहजहा नदीच्या मार्गाने बांग्लादेश पळून जाऊ शकतो, अशी शंका ईडीने व्यक्त केली आहे. त्यामुळे या बाबत सीमा सुरक्षा दलाला सतर्क करण्यात आले आहे. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांकडून सीमेवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवली जात आहे.
हे ही वाचा:
राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!
केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!
१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!
तसेच, शाहजहा याचा गुप्तपणे तपासही केला जात आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनीही तपास सुरू केला आहे. प्राप्तीकर विभागानेही शाहजहा यांच्या संपत्तीची माहिती जमवण्यास सुरुवात केली आहे. शाहजहा हे वारंवार त्यांचा मोबाइल नंबर बदलत असल्याचे समजते. त्यामुळे तपासकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांचा माग काढण्यासाठी सर्व पर्याय चाचपडले जात आहेत.