इस्रायल आणि हमासदरम्यान लेबेनॉन सीमेवरही तणाव वाढला आहे. इस्रायली हल्ल्यात तीन हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेच्या कमांडरचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, हिजबुल्लाच्या एका ड्रोननेही इस्रायली लष्कराच्या उत्तरेकडील मुख्यालयावर हल्ला केला. इस्रायल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत २४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलचे मौन
हिजबुल्लाहचे तिन्ही कमांडर दक्षिण लेबेनॉनच्या नबातीह क्षेत्रात एका गाडीमध्ये होते. या दरम्यान त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला झाला आणि तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबत इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायल संरक्षण दल अर्थात आयडीएफच्या मते, त्यांच्या लढाऊ विमानांनी किला गावाजवळ क्षेपणास्त्र डागण्याच्या तयारीत असलेल्या हिजबुल्लाहच्या एका तळावर हल्ला केला. आयडीएफवर विश्वास ठेवल्यास हा हल्ला आणि नबातीह येथील हल्ला हे दोन्ही वेगवेगळे आहेत.
हे ही वाचा:
राममंदिर प्राणप्रतिष्ठा, शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार
बांग्लादेश चीनच्या कह्यात जाणार नाही!
माटुंग्यात चेंडू लागून क्षेत्ररक्षकाचा मृत्यू
भारत-मालदीव द्विपक्षीय संबंध बिघाडाचे सावट मालदीवच्या आरोग्य पर्यटनावर
हिजबुल्लाहनेही केला हल्ला
हिजबुल्लाहने मंगळवारी हिजबुल्लाह कमांडर विसाम ताविल आणि हमासचा उपप्रमुख सलाह अरौरी याच्या हत्येचा बदला घेतला. हिजबुल्लाहने उत्तर इस्रायल भागात रॉकेट आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. ड्रोनने सफेद शहरातील आयडीएफच्या उत्तरेकडील मुख्यालयावर हल्ला केला.
हल्ल्याची तीन कारणे
जेरुसलेम येथील अल-अक्सा मशिदीला इस्रायलने अपवित्र केल्याचा हा बदला असल्याचे हमासचे म्हणणे आहे. इस्रायली पोलिसांनी २०२३मध्ये अल-अक्सा मशिदीत ग्रेनेड फेकून तिला अपवित्र केले होते. इस्रायलचे लष्कर सातत्याने हमासच्या ठिकाणांवर हल्ले करत आहे आणि अतिक्रमण करत आहे. इस्रायली लष्कर आमच्या महिलांवर हल्ले करत आहे, असे हमास सातत्याने सांगत आहे. तसेच, अरब देशांनी इस्रायलशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत, असे आवाहनही हमासचे प्रवक्ते गाजी हमाद यांनी अरब देशांना केले आहे. इस्रायल एक चांगला शेजारी आणि शांत राष्ट्र कधीच होऊ शकत नाही, असेही हमाद यांनी म्हटले होते.