मणिपूर सरकारने काँग्रेसला धक्का दिला आहे.राज्याच्या एन बिरेन सिंग सरकारने राहुल गांधीयांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’ लाँच करण्यास परवानगी नाकारली आहे. १४ जानेवारीला इंफाळ पूर्व जिल्ह्यातील ‘हफ्ता कांगजेबुंग’ या मैदानातून या यात्रेला सुरुवात होणार आहे.मात्र, मणिपूर सरकारने याला विरोध करत मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीला पर्यायी जागेची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने मैदान देण्यास नकार दिला आहे.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ‘मणिपूर ते मुंबई’ अशी असणार आहे. १४ जानेवारीला इंफाळ येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे.राहुल गांधींसह एआयसीसीचे वरिष्ठ नेते या यात्रेची सुरुवात करणार आहेत.मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ येथील ‘हफ्ता कांगजेबुंग’ या मैदानातून या यात्रेची सुरुवात होणार आहे, परंतु मणिपूर सरकारने याला विरोध दर्शवत पर्यायी जागेची व्यवस्था करण्यास भाग पाडले आहे.
हे ही वाचा:
राममंदिर प्राणप्रतिष्ठा, शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार
मोदींचे कौतुक केले म्हणून चिदंबरम पुत्राला काँग्रेसकडून नोटीस
अखिलेश यांचा अजब दावा, राम बोलावतील तेव्हाच सोहळ्याला जाईन!
मुइज्जू सरकारने लवकर भारताची माफी मागावी!
या संदर्भात मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के मेघचंद्र यांनी बुधवारी सांगितले की, भारत जोडो न्याय यात्रेच्या स्थळाच्या परवानगीबाबत आम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.परंतु मुख्यमंत्र्यांनी परवानगी नाकारली.हे अत्यंत दुर्दैवी आहे , असे मेघचंद्र म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हे लोकांच्या हक्काचे उल्लंघन आहे.सरकारने सार्वजनिक ठिकाणी यात्रेला परवानगी नाकारली असली तरी आम्ही दुसरी जागा शोधू.ही यात्रा तरुणांसाठी, महिलांसाठी,शेतकऱ्यांसाठी आणि गरिबांसाठी आहे. ही अराजकीय यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले.
या यात्रेच्या परवानगीसाठी मेघचंद्र यांनी बुधवारी मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांची त्यांच्या कार्यलयात भेट घेतली.मेघचंद्र यांच्यासोबत एमपीसीसीचे उपाध्यक्ष हरेश्वर गोस्वामी, एमपीसीसीचे कार्याध्यक्ष के देबदत्तसह आदी उपस्थित होते.