23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषलाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम

लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम

कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

मुलुंड (आय.टी.आय.) येथे सुरू झालेला लाइटहाऊस प्रकल्प दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. कोणत्याही पदवीबरोबरच जागतिक बाजारपेठेत आवश्यक कौशल्य विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हा फाऊंडेशन कोर्स आधुनिक काळातील कौशल्य विकासासाठी महत्वाची भूमिका बजावेल, असे कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी सांगितले. कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभाग (SEEID), व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुलुंड येथे मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे  उद्घाटन आयुक्त श्रीमती चौधरी यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा..

राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार

अयोध्येत एकाचवेळी १२००चपात्या बनवणारी मशीन पोहोचली!

मालदीवची भारतविरोधी ज्योत मालवली! घेतली नरमाईची भूमिका

संरक्षणापासून आरोग्यापर्यंत… भारताने मालदीवशी नेहमीच पाळला शेजारधर्म!

यावेळी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवीमहाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाचे संचालक योगेश पाटील, लाइटहाऊस कम्युनिटीजचे चेअरमन डॉ. गणेश नटराजनइक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेडचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी पी. डी. मुंद्रालाइटहाऊस कम्युनिटीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर उपस्थित होते.

आयुक्त श्रीमती चौधरी म्हणाल्या, युवक आणि युवतीना स्पोकन इंग्लिश आणि डिजिटल साक्षरता अशा प्रकारचे प्रशिक्षण लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही २१  व्या शतकातील  आवश्यक आणि गरजेची कौशल्ये आहेत. केवळ रोजगार देण्याऐवजी हा कार्यक्रम तरुणांना नोकरीत राहण्यास आणि करिअर घडविण्यास सक्षम करतो. दळवी म्हणालेगेल्या वर्षी लाइटहाऊस प्रकल्प सुरू करण्याबाबत सामंजस्य करार झाला आणि आज या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली. आय. टी. आय.मध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित जीवनात लागणारी कौशल्य विकसित होतील. डॉ. नटराजन म्हणाले की, लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून २०३० पर्यंत दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखों युवक-युवतींचे जीवन बदलण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा