मालदीवबाबतच्या वादात अन्य देशांनी भारताला दिलेली साथ चीनला मानवलेली दिसत नाही. चीनने या प्रकरणी नाक खुपसून भारताला अनाहूत सल्ला दिला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताने उदार मानाने विचार केला पाहिजे. भारताला वाटते या क्षेत्रात त्यांचाच प्रभाव राहावा. मालदीव आणि अन्य शेजारी देशांनी भारताच्या मनाप्रमाणे वागावे आणि चीनपासून दूर राहावे. मात्र दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये चीनला दुर्लक्षिले जाऊ शकत नाही, हा विचार भारताने केला पाहिजे, असा अनाहूत सल्ला दिला आहे.
सध्या मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीनच्या दौऱ्यावर आहेत. याआधी मालदीवच्या कोणत्याही अध्यक्षाने त्यांचा पहिला परदेशदौरा हा भारताचा केला आहे. या बाबत भारतात आलेल्या वृत्तांमुळे चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. राजकीय तज्ज्ञांचे मत घेऊन ग्लोबल टाइम्सने याबाबत टीका केली आहे.
मुइज्जू यांच्या दौऱ्याला चीनसमर्थक संबोधणे हे काही भारतीय नेत्यांमध्ये असलेल्या आत्मविश्वासाच्या अभावाचे द्योतक आहे. भारताने या क्षेत्रात चीन हा प्रतिस्पर्धी असल्याचे कारण देऊन शेजारी राष्ट्रांशी असलेल्या तणावपूर्ण संबंधांसाठी चीनला दोष देता कामा नये. चीनने कधीच मालदीवला भारतापासून दूर राहण्यास सांगितले नाही. आम्ही कधीच भारत आणि मालदीव यांच्यामधील संबंधांना संकटाच्या रूपात बघितलेले नाही,’ असेही यात नमूद केले आहे.
हे ही वाचा:
यंदा कर्तव्यपथावर ‘शिवराज्याभिषेक’
लक्षद्वीप मुद्द्यावरून इस्रायल भारताच्या पाठीशी; मोठ्या प्रकल्पाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टांगती तलवार
पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित
‘मुइज्जू आपल्या देशाचे हित बघत आहेत’
फुडन विद्यापीठात दक्षिण आशियाई अध्ययन केंद्राचे उपसंचालक लिन मिनवांग यांचा हवाला देऊन ग्लोबल टाइम्सने मुइज्जू यांची बाजू घेतली आहे. मुइज्जू हे चीन आणि भारतापैकी कोणाचाच पक्ष घेत नाहीत. त्यांना असे करण्याची आवश्यकताच नाही. ते आपल्या देशाच्या हिताचा विचार करत आहेत. भारत कथितपणे चीनसमर्थक नितीचे कारण सांगत मुइज्जू यांच्यावर दबाव आणत आहेत, असा दावा यात करण्यात आला आहे.