23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषवसंत मार्वलमध्ये अय्यप्पा पूजनातून एकात्मतेचा संदेश

वसंत मार्वलमध्ये अय्यप्पा पूजनातून एकात्मतेचा संदेश

तब्बल ३०० लोक आता सहभागी होऊ लागलेत.

Google News Follow

Related

बोरिवली पूर्वेतील वसंत मार्वल सोसायटी ही विविध हिंदू सोहळ्यांसाठी ओळखली जाते. नुकतेच याठिकाणी अय्यपा पूजेचे आयोजन करण्यात आले होते. हे या पूजेचे १३वे वर्ष होते. विशेष म्हणजे सोसायटीतील सगळेच लोक या पूजेत सहभागी होतात. प्रामुख्याने हा पूजाविधी मल्याळी समाजातील असला तरी सोसायटीतील मराठी, मारवाडी, गुजराती असे सगळ्या वर्गाचे लोक यात हिरीरीने पुढाकार घेतात आणि त्यातून एकात्मतेचा संदेश देतात.

यासंदर्भात सुमा अशोक यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही हा सोहळा आयोजित करतो. सोसायटीतील सगळे लोक एकत्र येईन आम्ही या सोहळ्याचे आयोजन करतो. खरे तर, हा सोहळा मल्याळींचा आहे पण आम्ही सगळे एकत्र येतो. मराठी, गुजराती, मारवाडी, मल्याळी, सगळे लोक एकत्र येतात आणि या पूजेत सहभागी होतात. प्रचंड उत्साह असतो. केरळी वस्त्रे हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. पूर्वी सगळे लोक असे कपडे परिधान करत नव्हते पण आता सगळेच लोक प्राधान्याने हे कपडे परिधान करू लागले आहेत. सगळ्या महिला केरळी पद्धतीच्या साड्या परिधान करतात. काही लोक तर त्यासाठी केरळमधूनही कपडे मागवतात. एकमेकांना सहकार्य करत हा सगळा विधी होतो.

सुमा म्हणाल्या की, पूजेदरम्यान भजन होते. पुजाऱ्यांनी पूजा केल्यानंतर मग आम्ही त्यात सहभागी होतो. भजनी मडळ येते. जवळच्या अय्यप्पा मंदिरातून ही भजन मंडळी येते आणि इथे भजन म्हटले जाते. त्यानंतर तिथे दिवे लावले जातात. या  दिव्यज्योती सोहळ्यात लहान मोठे असे १८ दिवे लावले जातात. नंतर आम्ही सगळे लाइट्स बंद करतो आणि मग या दिव्यांच्या प्रकाशात आम्ही पवित्र अनुभव घेतो. हा अनुभव घेणे प्रत्येकासाठीच आवश्यक असते.

हे ही वाचा:

एमटीएचएल’पाठोपाठ जानेवारीअखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार

बोरिवलीत शस्त्रसाठ्यासह सापडले ६ संशयित!

उद्धव ठाकरेंचे दरवाजे आता बंद

 पाच वर्षाच्या मुलीवर ब्रेन ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

सुमा म्हणाल्या की, गेल्या काही वर्षात या पूजेला सगळ्यांचाच उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. पूजेसाठी सोसायटीतील लोक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. गेली १३ वर्षे आम्ही हा सोहळा करतो आहोत. पूर्वी १०० एक लोक येत असत पण आता ती संख्या तिप्पट झालेली आहे. आता प्रत्येक कुटुंबातील सगळे लोक या पूजाविधीत सहभागी होतात. सगळे त्याचा आनंद घेतात. प्रसाद म्हणून पायसम, मेदू वडा दिला जातो. उन्नीअप्पमचा प्रसाद दिला जातो. पोह्याचा प्रसादही असतो. शिवाय सोसायटीतील इतर लोकही आपापल्या पद्धतीने प्रसाद बनवून आणतात, कुणी पेढे आणतात, कुणी फळे आणतात. मग सगळ्यांना पुरेल इतका प्रसाद होतो.

 

सुमा अशोक यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानेही आमच्या सोसायटीत उत्साहाचे वातावरण आहे. नुकतीच आम्ही एक रथयात्रा काढली होती. त्याचे स्वरूप उत्तर भारतीय होते पण त्यात आम्ही पंचवाद्यमचे आयोजन करून उत्तर आणि दक्षिण भारतीय संगमही केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा