26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरधर्म संस्कृतीसीतामाईच्या माहेराहून 'जावई' श्रीरामासाठी आले रुखवत

सीतामाईच्या माहेराहून ‘जावई’ श्रीरामासाठी आले रुखवत

ट्रकमधून आली आभूषणे, चांदी, सोने, फळे, मिष्ठान्ने

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशामधील अयोध्येत २२ जानेवारी रोजी भव्य असा राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात लगभग सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून राम मंदिरासाठी भेटवस्तू पाठविण्यात येत आहेत. अशातच प्रभू श्री रामांच्या सासरहून ‘भार’ म्हणजेच रुखवत आला आहे. शनिवार, ६ जानेवारी रोजी माता सीतामाई यांच्या माहेरहून म्हणजेच नेपाळमधील जनकपुरी येथून ‘भार’ अयोध्येत पोहचला आहे.

मिथिले ची परंपरा आहे कि मुलीच्या सासरी जर काही नवीन कार्य किंवा काही निर्माण होत असेल तर माहेरहुन ‘भार’ पाठवला जातो. हीच परंपरा पाळत नेपाळहून हा ‘भार’ पाठविण्यात आला आहे. श्री रामलल्ला आपल्या भव्य अशा घरात विराजमान होणार आहेत आणि या शुभ मुहूर्तावर माता सीतामाई हिच्या माहेराहून या परंपरेप्रमाणे भेटवस्तू आल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. हा क्षण अद्भुत आणि भावुक होता, असंही ते म्हणाले.

या ‘भार’ मध्ये विविध  भूषणे, चांदी, सोने, फळ, मिष्ठान्न आणि अन्य खाद्य आणि गृहस्थी सामग्री असून या सामानाने भरलेले अनेक ट्रक सीतामाईच्या माहेरातून अयोध्येत आले आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपतराय यांनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला.

हे ही वाचा:

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या मुक्ततेप्रकरणी सोमवारी निकाल

आयएएफ सी १३० जे विमानाचे कारगिल हवाई पट्टीवर यशस्वी लँडिंग

टी २० विश्वचषक स्पर्धेत विराट-रोहित हवेच!

इस्रायलने केला हमासच्या आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा

या भेटवस्तू आणलेल्या महिलांनी सांगितले की, मुलीला सासरी पाठविताना ज्या वस्तू दिल्या जातात त्या सर्व दिल्या आहेत. भांडी, सिंदूर, चुडा, वस्त्र, मिठाई, फळे अशा सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रभू रामांसाठी वस्त्रे, पादुका, भोजनासाठी वस्तू, सोन्या- चांदीचे धनुष्य असं सर्व देण्यात आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा