गेल्या काही दिवसांपासून सायबरहल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. सरकारी कार्यालयांच्या वेबसाइटवर हल्ला करून त्यांच्या कम्प्युटर यंत्रणेत घुसण्याचाही प्रयत्न केला जात असल्याने संपूर्ण देश याबाबत कमालीचे सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयासह अनेक सरकारी वेबसाइट्स शनिवारी रात्री डाऊन झाल्या होत्या.
सायबर अहवालानुसार, यामागे सायबरहल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाची वेबसाइट लवकरच पूर्ववत करण्यात आली. मात्र परराष्ट्र मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाची वेबसाइट अजूनही डाऊन आहे. या दोन्ही वेबसाइट सुरू केल्या असता एरर दाखवला जात आहे.
हे ही वाचा:
‘राहुल गांधी यांच्या यात्रेआधी जागावाटप करा, अन्यथा…’
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल म्हणतात, आता तुरुंगातच मेलो तर बरे’!
मालदीवच्या नेत्याने केलेल्या भारताच्या अपमानानंतर बायकॉट मालदीव ट्रेंडमध्ये
बांगलादेशच्या हसीना म्हणतात, भारत हा विश्वासू मित्र!
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सायबर हल्ल्यांमुळे या वेबसाइट बंद झाल्या आहेत. मालदीवच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने या संदर्भात ‘एक्स’ या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. ‘राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाच्या वेबसाइटला तांत्रिक समस्या उद्भवली आहे. एनसीआयटी आणि अन्य तपास यंत्रणा यावर तोडगा काढण्याचे काम करत आहेत,’ असे अध्यक्षांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. काही तासांनंतर अध्यक्षांच्या कार्यालयाची वेबसाइट पूर्ववत करण्यात यश आले मात्र अन्य वेबसाइटला अडचण जाणवतच होती. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला.