मुंबईत नऊ कोटींच्या कोकेनसह दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी सकिनाका पोलिसानी ही कारवाई हंसा इंडस्ट्रीज जवळ ही कारवाई केली. या दोघांपैकी एकाकडे कोकेन हा अमली पदार्थाच्या कॅप्सूल मिळून आलेल्या असून कोकेनने भरलेले कॅप्सूल दक्षिण आफ्रिका येथून आणण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
डेनियल नायमेक (३८) आणि जोएल अलेजांद्रो वेरा रामोस (१९) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. डेनियल हा नायजेरियन नागरिक असून जोएल हा व्हेनेज्युएला देशाचा नागरिक आहे.अंधेरी पूर्व साकीविहार रोड येथील हंसा इंडस्ट्रीज जवळ डेनीयल हा नायजेरियन इसम संशयास्पदरित्या उभा होता. साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे हे गस्तीवर असताना त्यांनी डेनीयलला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
हे ही वाचा:
मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!
शिवछत्रपती पुरस्कार यादीतून डावललेल्या खेळांच्या संघटना नाराज
निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार, मतदान केंद्राला लावली आग!
अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प
त्याच्यावरील संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याजवळ असलेली पिशवी तपासली असता त्यात मोठ्या प्रमाणात कॅप्सूल मिळून आल्या.पोलिसांनी त्याच्यकडे कसून चौकशी केली असता त्याला जोएल अलेजांद्रो वेरा रामोस याने या कॅप्सूल दिल्या असून हे कॅप्सूल नवी मुंबईत एका नायजेरियन नागरिकाला देण्यात येणार होत्या. साकीनाका पोलिसांनी जोएका याला साकीनाका येथील एका हॉटेलमधूल ताब्यात घेऊ त्याच्याकडे चौकशी केली असता तो व्हेनेज्युएला चा नागरिक असून तो दक्षिण आफ्रिका येथून कोकेन या अमली पदार्थाने भरलेल्या कॅप्सूल स्वतःच्या पोटातून भारतात घेऊन आला होता.
मुंबई विमानतळा वरून सुखरूप बाहेर पडल्यानंतर त्याने साकीनाका परिसरात एका हॉटेलमध्ये खोली बुक करून त्या ठिकाणी आला व हॉटेलच्या खोलीत पोटातील कोकेनने भरलेल्या कॅप्सूल उलटीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आल्या, त्यानंतर या कॅप्सूलचा डिलेव्हरी त्याने डेनियल नायमेक यांच्याकडे दिली. डेनियल हा हे कॅप्सूल नवीमुंबई येथे एकाला देणार होता अशी माहिती समोर आली. पोलिसांनी जप्त केलेल्या कॅप्सूल मध्ये ९ कोटी रुपये किमतीचा कोकेन मिळून आला.
साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही परदेशी नागरिकांना अटक करून त्याच्या विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस कायदा ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.