बांग्लादेशमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.मात्र, यावेळी निवडणुकीला जोरदार विरोध होत आहे.मतदानापूर्वीच अनेक मतदान बूथ जाळण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी शाळा देखील जाळण्यात आल्या आहेत.यावेळी विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.विरोधी पक्षनेते रस्त्यावर उतरले आहेत.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजधानी ढाकाच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
ढाका येथील गोपीबाग परिसरात शुक्रवारी काही बदमाशांनी एका ट्रेनला आग लावली, या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.बांग्लादेशातील १२ विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या ४८ तासांमध्ये संपाची घोषणा केली आहे.बांग्लादेशातील ही १२वी सार्वत्रिक निवडणूक आहे.पंतप्रधान शेख हसीना पुन्हा या पदाच्या दावेदार आहेत. ते २००९ पासून बांगलादेशात सत्तेवर आहेत.
हे ही वाचा:
भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेला मोठे यश, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचं कौतूक!
अयोध्येबाबत म्हणे “अन्यायग्रस्तता” रुजवली?
‘श्री राम आमचे पूर्वज’,काशीच्या मुस्लिम महिला आयोध्येला रवाना!
मामाशी असलेल्या वैमनस्यातून मोहोळचा झाला ‘गेम’
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे बांग्लादेशाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.सर्वत्र पोलीस आणि सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.बांग्लादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी ( बीएनपी) या निवडणुकीवर बहिष्कार घालत आहे.शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर निष्पक्ष निवडणुक घ्यावी, असे बीएनपीने म्हटले आहे.मात्र, हसीना यांनी विरोधी पक्षाची मागणी मान्य करण्यास नकार दिला. बीएनपीचे म्हणणे आहे की, निवडणुका निष्पक्षपणे घेतल्या जात नाहीत आणि हेराफेरी करून शेख हसीना यांची अवामी लीग जिंकते.
बांग्लादेशात गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत.या आंदोलनामध्ये आतापर्यंत किमान १० जणांना जीव गमवावा लागला आहे.विरोधकांकडून मौलवीबाजार आणि हबीगंज येथील मतदान केंद्राला आग लावण्यात आली.पोलिसांचे म्हणणे आहे की, दोन दिवस अगोदरच त्या शाळांना लक्ष केले जात आहे जिथे मतदान होणार आहे.रविवारी मतदान केंद्रावर आठ लाख पोलीस, निमलष्करी दल आणि इतर सैनिक तैनात करण्यात येणार आहेत.याशिवाय लष्कर,नौदल आणि हवाई दलाचे अधिकारीही शांतता राखण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.