सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता आणि त्याच्या दोन मुलींचे विमान अपघातात निधन झाले आहे. ३० वर्षांच्या कारकिर्दीत टॉम क्रूझ आणि जॉर्ज क्लूनी यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम करणारा जर्मन वंशाचा अमेरिकन अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हरचा गुरुवारी कॅरिबियन बेटाच्या किनाऱ्यावर विमान अपघातात मृत्यू झाला.या अपघातात ख्रिश्चन ऑलिव्हरसह त्याच्या दोन मुलींचाही समावेश आहे, असे द गार्डियनने वृत्त दिले आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, ‘द गुड जर्मन’ आणि ‘स्पीड रेसर’ या चित्रपटांमध्ये झळकलेला क्रिश्चियन ऑलिव्हर गुरुवारी खासगी विमानाच्या अपघातात मुलींसह मरण पावला. असे रॉयल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलीस फोर्सने एका निवेदनात म्हटले आहे. ५१ वर्षीय ऑलिव्हर, त्याच्या मुली मॅडिटा (१० वर्षे) आणि अॅनिक (१२ वर्षे) आणि पायलट रॉबर्ट सॅक्स, असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.
हे ही वाचा:
दाऊदच्या स्थावर मालमत्तेची खरेदी केली दिल्लीच्या अभय श्रीवास्तव यांनी
भव्य राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट
जय श्रीराम : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पोटी येऊदे ‘राम’
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० तोफगोळे डागले
हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी मध्यरात्रीनंतर सेंट लुसियाला जात होते. रॉयल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलिस दलाने नोंदवले की, सेंट लुसियाच्या मार्गावर असलेल्या विमानाला टेकऑफनंतर काही वेळातच अडचणी आल्या आणि हे विमान समुद्रात कोसळले.ऑलिव्हर मुलींबरोबर नवीन वर्षानिमित्त व्हेकेशनसाठी इथे आला होता, अशी माहिती समोर आली आहे.अपघातानंतर मच्छीमार आणि तटरक्षक दल ताबडतोब घटनास्थळी गेले आणि त्यांनी चारही मृतदेह बाहेर काढले.घटनास्थळी दाखल झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या सर्वांना मृत घोषित केले.
दरम्यान, ऑलिव्हरने आपल्या अभिनयाची सुरुवात १९९४ मध्ये “सेव्ह बाय द बेल: द न्यू क्लास” मधील भूमिकेने केली.त्याने “द गुड जर्मन”, “स्पीड रेसर” आणि “वाल्कीरी” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऑलिव्हरने आतापर्यंत ६० हून अधिक चित्रपट व टीव्ही मालिका केल्या आहेत. ऑलिव्हरच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे.