जगाच्या पाठीवर सध्या युक्रेन- रशिया आणि इस्रायल- हमास यांच्यात युद्ध सुरू आहेत. अशातच उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर तोफगोळे डागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एक, दोन नव्हे तब्बल २०० तोफगोळे डागल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या दिशेने २०० तोफगोळे डागले, पण दक्षिण कोरियाच्या हद्दीत तोफगोळे पडलेले नाहीत. अजुनही दोन्ही देशांच्या सीमाभागात गोंधळाचं वातावरण आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं दक्षिणेकडील येओनप्योंग बेटावर २०० तोफगोळे डागले. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या २ हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दक्षिण कोरियानं या कारवाईचा निषेध केला असून याला ‘प्रक्षोभक कृती’ असं म्हटलं आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेतील शाळेत गोळीबार; एका विद्यार्थ्याचा मृत्यू
पंतप्रधान मोदींविरोधात केलेले वक्तव्य काँग्रेस नेत्याला भोवणार!
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी निवड!
चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!
दक्षिण कोरियाच्या लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं शुक्रवारी २०० हून अधिक तोफगोळे दक्षिण कोरियाच्या दिशेने डागले. दोन्ही देशांमधील वास्तविक सागरी सीमा नॉर्दर्न लिमिट लाइन (NLL) च्या उत्तरेला हे तोफगोळे पडले. मात्र, कोणतंही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
उत्तर कोरियानं युद्धाभ्यास करण्यासाठी तोफगोळ्यांचा सराव केला. नव्या शस्त्रांच्या तपासणीचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफनं म्हटलं आहे की, बफर झोनमध्ये तोफगोळे डागत उत्तर कोरियानं २०१८ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन केलं आहे. दरम्यान, गेल्या काही तासांमध्ये दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.