27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामामुख्यमंत्री योगी आणि अयोध्या मंदिर बॉम्ब धमकी प्रकरणी दोघांना अटक!

मुख्यमंत्री योगी आणि अयोध्या मंदिर बॉम्ब धमकी प्रकरणी दोघांना अटक!

दोघे आरोपी उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी

Google News Follow

Related

उत्तरप्रदेशातील अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.अयोध्येत सोहळ्याची तयारीही जोरदार सुरु आहे.देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे.दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अयोध्येतील राम मंदिर आणि एका वरीष्ठ अधिकाऱ्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती.याप्रकरणी उत्तरप्रदेश एसटीएफच्या टीमने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

युपीच्या एसटीएफ टीमने बुधवारी राजधानी लखनऊ येथील गोमती नगरातील विभूती विभागातून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी मुख्यमंत्री योगी आणि राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.ताहर सिंह आणि ओमप्रकाश मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.हे दोघे उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, एका पॅरामेडिकल संस्थेत काम करत होते.

हे ही वाचा:

महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?

पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

उत्तरप्रदेश एसटीएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नोव्हेंबर मध्ये सोशल मीडियावर एक धमकीची पोस्ट आली होती.पोस्ट मध्ये म्हटले होते की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एसटीएफ प्रमुख अमिताभ यश आणि अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवून देवू. ही धमकीची पोस्ट @iDevendraOffice यानावाने ट्विटरवर देण्यात आली होती.तपासात उडत झाले की धमकी देण्यासाठी alamansarikhan६०८@gmail.com आणि zubairkhanisi१९९@gmail.com या मेल आईडीचा वापर केला होता.तपासात उघड झाले की, आरोपी ताहर सिंहने या मेल आयडी बनवल्या आणि दुसरा आरोपी ओम प्रकाशने बॉम्बच्या धमकीचा मेल पाठवला.याप्रकरणी एकटीएफ टीम अधिक तपास करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा