भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेप्रकरणी (PAP) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २० हजार कोटींच्या PAP घोटाळ्यात किरीट सोमय्यांनी थेट शरद पवार आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. शाहीद बलवा आणि पवारांचे निकटवर्ती चोरडिया यांना लाभ मिळाला असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन खुलासे केले आहेत. “PAP घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे. PAP घोटाळ्यात पवार परिवार सामील आहे,” असा दावा सोमय्या यांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून मुंबई महापालिका ठाकरे सरकारच्या २ हजार कोटींच्या PAP घोटाळ्यात आता शरद पवार आणि पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे.
भांडूप येथील १९०३ सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरचा पुणे येथील न्यू वर्ल्ड लँडमार्क एल. एल. पी. ला देण्यात आला. न्यू वर्ल्ड लँडमार्क एल. एल. पी. कंपनीने यासाठी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीसोबत करार केला आहे. ही जागा प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीची आहे. त्याच्या सोबत या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वर्ल्ड लँडमार्क एल. एल. पी. कंपनीने केले आहे.
हे ही वाचा:
अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच
रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र
सीएएची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच!
जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!
१९०३ सदनिका महापालिका बाजारभावाने ५८ लाखात एक सदनिका घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठी जमीन आणि बांधकामाचा खर्च म्हणून १५ ते १७ लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये ४० लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी आणि चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल. एल. पी कंपनीला मिळणार आहे, असे सोमय्या म्हणाले. या PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.