29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामामहाराष्ट्रातील इसिस दहशतवादी मॉड्यूल: दहशतवाद्यांसाठी ‘पडघा’ म्हणजे ग्रेटर सीरिया

महाराष्ट्रातील इसिस दहशतवादी मॉड्यूल: दहशतवाद्यांसाठी ‘पडघा’ म्हणजे ग्रेटर सीरिया

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील इसिसच्या (ISIS) दहशतवादी मॉड्यूलबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दहशतवादी मॉड्युल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने इसिसशी संबंधित संघटनेला दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासाठी निधी पुरवला होता.

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय की “आरोपी शर्जील शेखने त्याचे कोटक महिंद्रा बँक खाते वापरून सीरियास्थित ‘द मर्सिफुल हँड्स’ या संस्थेला १७६ डॉलर्स दान केले होते.” तसेच दुसरा आरोपी, झुल्फिकार अली बडोदावाला, मे- जून २०२२ मध्ये भिवंडी तालुक्यातील पडघा- बोरिवली या गावात गेला, त्यांच्या म्हणण्यानुसार पडघा गाव हे भारतातील ‘अल शाम’ (ग्रेटर सीरिया) होतं, असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

याशिवाय एनआयएला शर्जील शेखच्या सेल फोनमधून व्हिडिओ सापडले आहेत. ज्यावर इस्लामिक स्टेटचा (ISIS) झेंडा होता, गोळीबार करण्याचे व्हिडीओ, सीरियामधील मास्क घालून चालतानाच व्हिडीओ असेही काही व्हिडीओ आहेत. इसिसच्या खलिफाची भाषणं, पाकिस्तान आणि सीरियाच्या विलायहची भाषणही फोनमध्ये सापडली आहेत. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात व्हीपीएन नेटवर्कचा वापर केला जात होता. आयसीसच्या दहशतवाद्यांकडून एका व्यक्तीचा गळा चिरण्याचा व्हिडीओही सापडला होता.

हे ही वाचा:

छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई; १४ जणांना नोटीस

जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!

सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं, पाणबुडी प्रकल्प राज्यातचं!

‘एका न्यायाधीशाचे श्रेय नाही, अयोध्या खटल्याचा निर्णय हा सर्वसंमत’

व्हॉइस ऑफ हिंदची प्रचार पत्रिका आणि इतर जिहादी कागदपत्रही आरोपींच्या फोनमध्ये सापडली आहेत. आरोपींच्या फोनमध्ये प्रक्षोभक भाषणाचे व्हिडीओ, देशाबाहेर मुस्लिमांच्या होत असलेल्या हत्या, खिलाफत आणि इतर संघटनांच्या पत्रिका अशी कागदपत्रे सापडली आहेत. व्हॉटअपवर हे आरोपी संपर्कात होते, प्रक्षोभक भाषणे आणि लिंकही शेअर केल्या जात होत्या. मेलद्वारे आरोपी हे आयसीसच्या संपर्कात होते हेही स्पष्ट झालं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा