25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाछत्रपती संभाजीनगरमध्ये उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई; १४ जणांना नोटीस

छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई; १४ जणांना नोटीस

एका संघटनेच्या गुप्त बैठकीत जानेवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाविरोधात कट रचल्याचा आरोप

Google News Follow

Related

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरातील १४ जणांना नोटीस दिल्या आहेत. या सर्वांना १५ ते १८ जानेवारीदरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जानेवारी महिन्यात होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत जानेवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली असल्याचे काही पुरावे मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये जानेवारी महिन्यात होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली. तर, या बैठकीचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले होते. अयोध्येमधील धार्मिक स्थळांबाबत उल्लेख बैठकीत झाल्याने तेलंगणा पोलिसांनी तत्काळ ते पुरावे उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाकडे पाठवले. बैठकीचे पुरावे मिळताच उत्तर प्रदेश एटीएसने ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी उत्तर प्रदेशचे एटीएस पथक शहरात तपासासाठी आले होते, आणि यावेळी त्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील १४ जणांना नोटीस बजावली आहे. या बैठकीला दहशतवादी संघटना इसिसचे समर्थनही करण्यात आल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!

सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं, पाणबुडी प्रकल्प राज्यातचं!

‘एका न्यायाधीशाचे श्रेय नाही, अयोध्या खटल्याचा निर्णय हा सर्वसंमत’

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला ४४७.५ कोटींची जीएसटी नोटीस

जानेवारी महिन्यातील मोठ्या आयोजनाचे गांभीर्य ओळखून उत्तर प्रदेश प्रशासनाने लखनौ येथील दहशतवादविरोधी पोलिस ठाण्यात भादंवि कलम १५३ अ, १५३ ब, भादंवि व १३/१८ बेकायदेशीर क्रिया (यूएपीए) अधिनियम १९६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी नुकतेच शहरात येऊन गेले. त्यांनी संशयितांची चौकशी करून नोटीस बजावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा