24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाजपानच्या भूकंपाने जागवल्या २००४च्या महाप्रलयाच्या आठवणी!

जपानच्या भूकंपाने जागवल्या २००४च्या महाप्रलयाच्या आठवणी!

अडीच लाख नागरिकांचा झाला होता मृत्यू

Google News Follow

Related

जपानमध्ये झालेली भूकंपाची मालिका आणि आलेल्या त्सुसामीने सन २००४च्या ‘बॉक्सिक डे’ला आलेल्या त्सुनामीच्या कटू आठवणी जागवल्या. तेव्हा सुमारे अडीच लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.

१ जानेवारीसारखाच २६ डिसेंबर, २००४चा दिवसही काळा सोमवार ठरला होता. संपूर्ण जग सुट्टीच्या उत्साहात होते आणि ख्रिसमसच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. पर्यटक त्यांच्या सुट्टीचा आनंद लुटत होते आणि दक्षिण आशियाई देशांतील स्थानिक नागरिक त्यांचे दैनंदिन काम करत होते. तेव्हा त्सुनामीने जोरदार धडक दिली.

सुमारे अडीच लाख लोकांनी एका दिवसात जीव गमावला तर १७ लाख नागरिक बेघर झाले. तेव्हा इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. त्यामुळे समुद्रात ५०० मैल प्रति तास इतक्या वेगाने लाटांचा जोर होता. त्याचा फटका दक्षिणपूर्वेकडील १८ देश आणि दक्षिण आफ्रिकेला बसला होता. त्यावेळी स्थानिक आणि पर्यटकांचाही मृत्यू झाला. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वर्षे लोटतील, इतकी या हानीची तीव्रता होती. किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांचे तर होत्याचे नव्हतेच झाले होते.

हे ही वाचा:

‘एका न्यायाधीशाचे श्रेय नाही, अयोध्या खटल्याचा निर्णय हा सर्वसंमत’

महाराष्ट्र पोलीस दलाची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी

भारत सरकारने ‘तहरीक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला ४४७.५ कोटींची जीएसटी नोटीस

इंडोनेशियातील शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले. बांधबंधाऱ्यांचे नुकसान झाले. हजारो शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते. हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीमुळे १० हजार ७४९ जण मारले गेले तर, पाच हजार ६४० जण बेपत्ता झाले होते.

 

पर्यावरणावर विपरित परिणाम, पर्यटनाला फटका

प्रवाळ, खारफुटी, किनाऱ्यालगतची पाणथळ जागा… अशा जैवविविधतेत महत्त्वाच्या घटकांवरही विपरित परिणाम झाला होता. तर, मासेमारी आणि पर्यटन क्षेत्राचेही अतोनात नुकसान झाले. एकत्रित नुकसान धरल्यास सुमारे १३ अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. सतर्क यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने सोमालिया, म्यानमार, थायलंड, भारत, श्रीलंका आणि मालदीवला या त्सुनामीचा जोरदार फटका बसला.

सतर्क यंत्रणा बसवण्यासाठी पुढाकार

या अपरिमित नुकसानामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील देशांनी त्सुनामीचा इशारा देणारी यंत्रणा बसवण्यासाठी पुढाकार घेतला. मादागास्कर देशाने आधीच त्सुनामीचा इशारा देणारी यंत्रणा बसवण्यासह जनजागृती मोहिमा, ड्रिल आयोजित करण्याच्या योजना आखल्या. भारतानेही १५ ऑक्टोबर, २००७ रोजी त्सुनामीचा इशारा देणारी यंत्रणा बसवली. या केंद्राला भारतीय हवामान विभाग आणि अन्य आंतरराष्ट्रीय प्राधिकरणाकडून इत्थंभूत माहिती मिळते. त्सुनामीने दिलेल्या धड्यामुळे जगभरातीलच आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाला गती मिळाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा