सोमवारी ड्रेस कोड लागू झाल्यामुळे हाफ पॅंट, शॉर्ट्स, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घातलेल्या लोकांना ओडिशाच्या पुरीतील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही , असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना साधे कपडे परिधान करावे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन नियम लागू झाल्यामुळे मंदिरात १२ व्या शतकातील ‘धोतर’ आणि ‘गमछे’ परिधान केलेले पुरुष दिसले, तर बहुतेक महिला साड्या आणि किंवा सलवार कमीजमध्ये दिसल्या.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने (SJTA) हॉटेल्स धारकांना ड्रेस कोड बाबत लोकांना जाणीव करून देण्यास सांगितले आहे कारण बहुतेक भाविक हॉटेल्समध्ये मुक्काम करून मंदिरात येतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.तसेच मंदिर प्रशासनाकडून मंदिराच्या आत गुटखा आणि पान खाणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.यासह प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जपानमध्ये झालेल्या भूकंपात १२ जणांचा मृत्यू
योगी सरकारचा मोठा निर्णय; स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक!
दाऊदच्या आईच्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव!
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक!
अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या दिवशी गर्दी हाताळण्यासाठी मंदिराचे दरवाजे पहाटे १.४० वाजता भक्तांसाठी पुन्हा उघडण्यात आले.संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ३.५ लाख लोकांनी मंदिराला भेट दिल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.तसेच मंदिरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती, असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.भाविकांना बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी नववर्षाच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुप्पट असल्याचे पोलिसांनी सांगितले.