उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेत स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केले आहे. परिवहन विभागाचे प्रधान सचिव एल व्यंकटेश्वरलू यांनी हा आदेश जारी केला आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांनी हा नियम लागू होईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
२९ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार दिव्यांग मुलांच्या सुरक्षेसाठी आता सर्व स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन नियमांमध्ये हा नियम आधीपासूनच आहे. काही स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. मात्र या अधिसूचनेत राज्यातील सर्व स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक!
अरुण योगीराज यांनी साकारलेल्या राममूर्तीची होणार प्रतिष्ठापना!
अर्जुन पुरस्कार विजेत्या पोलीस उपाधीक्षकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
कृष्णविवरांचा तपास करणारा भारत अमेरिकेनंतर दुसरा देश
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही बसवल्याने मुलांची सुरक्षा वाढेल. याशिवाय स्कूल व्हॅनवरही लक्ष ठेवता येईल. याशिवाय लहान मुलांसोबत घडणाऱ्या अप्रिय घटनांनाही आळा बसणार आहे. हे सीसीटीव्ही खासगी स्कूल व्हॅन आणि कुटुंबांच्या स्वत:च्या वैयक्तिक व्हॅनमध्ये बसवले जातील.