24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरधर्म संस्कृती‘अयोध्येला भेट द्या... तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल’

‘अयोध्येला भेट द्या… तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल’

योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

Google News Follow

Related

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोमाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यासाठी निवडक मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले असले तरी नंतर रामभक्त मोठ्या उत्साहाने तेथे दाखल होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानंतर अयोध्येला भेट देण्याचे आवाहन सोमवारी रामभक्तांना केले आहे. ‘तुम्ही अयोध्येला नक्की भेट द्या. तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘अयोध्येत ‘श्री राम जन्मभूमी चळवळ सुरू असताना विश्व हिंदू परिषद तिचे नेतृत्व करत होती. या मोहिमेसाठी साधूसंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शन लाभले होते. आम्ही म्हणायचो, जेव्हा सगळे भारतीय एकावेळी ‘जय श्रीरामाचा उद्घोष करतील, तेव्हा राम मंदिराचा प्रश्न मिटेल,’ असे योगी म्हणाले. मथुरेत साध्वी रितंभरा यांच्या षष्ठ्याब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.

‘तुम्ही २२ जानेवारीनंतर अयोध्येला आवर्जून भेट दिली पाहिजे. तुम्हाला त्रेतायुगात आल्यासारखे वाटेल. आता तर अयोध्येत विमानतळही सुरू होत आहे. आता प्रभू राम त्यांच्या पुष्पक विमानाने या भूतलावर उतरतील,’ असे ते म्हणाले. ‘ पंतप्रधान ३० डिसेंबर रोजी अयोध्येला आले. आता तुम्ही येथील पायाभूत सुविधा पहा. अयोध्या आता रस्ते आणि हवाई वाहतूक मार्गाने जोडली गेली आहे. आता जलमार्गानेही अयोध्यानगरीला जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे योगी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

संसद हल्ल्यातील आरोपी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा खात्मा?

मोदीच येणार! द गार्डीयनचाही दावा

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

आग्राची महिला प्रभू रामांच्या मूर्तीसाठी विणत आहे रेशीम वस्त्रे!

‘आपल्या सर्वांची एकच प्रतिज्ञा आहे, विकसित भारत. आपण नव्या भारताचे साक्षीदार होत आहोत. ज्या व्यक्ती आधी अयोध्येचे नाव घेण्यासही कचरत असत, ते आता उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या आमंत्रणाची वाट पाहात आहेत,’ असाही टोला त्यांनी लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा