पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत. याशिवाय आता पुढील काही महिन्यात भारतात लोकसभा निवडणुका पडणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सरकारच्या कामगिरीचा आढावा मागून घेतला आहे. पण, हा आढावा मंत्री,खासदार किंवा आमदारांकडून मागितलेला नसून थेट जनतेकडून अभिप्राय मागितला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट टाकली आहे. ‘जन मन सर्व्हे’ या उपक्रमाअंतर्गत याची माहिती मागविण्यात आली आहे.
‘जन मन सर्व्हे’ ही संकल्पना नमो ऍपने १९ डिसेंबर रोजी जाहीर केली होती. अशाच प्रकारचा उपक्रम २०१८ सालीही हाती घेण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये मोदी सरकार आणि स्थानिक लोक प्रतिनिधीची कामगिरी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी विस्तृत प्रश्नावली देऊन उत्तरे मागितली जातात. नमो ॲपवरी या अभिप्राय उपक्रमात सरकारी योजनांबाबत सामान्य लोकांना काय वाटते, स्थानिक खासदार आणि आमदार यांच्या कामाबद्दल ते समाधानी आहेत का? याबाबतची प्रश्नावली सादर करण्यात येते. लोकांनी भरलेल्या माहितीच्या आधारे भाजपाकडून पुढील रणनीती ठरविली जाते. २०१८ साली घेतलेल्या सर्व्हेनंतर भाजपाने २०१४ साली निवडून आलेल्या अनेक खासदारांना पुढील निवडणुकीत वगळले होते, अशी माहिती आहे.
What do you think of the progress achieved by India in various sectors in the last 10 years?
Share your feedback directly with me through the #JanManSurvey on the NaMo App!
Click here to participate now:https://t.co/CXcuYLI9Qx
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2024
हे ही वाचा:
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं!
बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!
इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!
२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा
हा अभिप्राय देण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये नमो ऍप डाऊनलोड करावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाची कामगिरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी सदर ऍप तयार करण्यात आले होते. सध्या दोन कोटी लोक हे ऍप वापरतात. २०१६ साली नोटबंदी केल्यानंतर आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी आणि २०२२ साली उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशाचप्रकारचा उपक्रम भाजपाने हाती घेतला होता.