25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामा३१ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सापडला जाळ्यात!

३१ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सापडला जाळ्यात!

मुंबई पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून ३१ वर्षांनंतर एका खुनाच्या गुन्ह्यात वाँटेड असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक भिसे (६२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी दीपक भिसे याच्यावर १९८९ मध्ये राजू चिकना याची हत्या केल्याचा आणि धर्मेंद्र सरोजच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.आरोपी दीपक याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी दीपक भिसेला १९९२ मध्ये जमीन मंजूर करण्यात आला होता.परंतु तो न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी उपस्थित राहिला नाही.त्यानंतर २००३ मध्ये न्यायालयाने आरोपी दीपकला फरार घोषित केले.पोलिसांनी सांगितले की, आरोपी दीपकचा मूळचा पत्ता आमच्याकडे होता. मूळच्या पत्त्यानुसार मुंबई उपनगरतील कांदिवलीतील तुळसकरवाडी येथे पोलीस तपासासाठी गेले असतात तेथील स्थानिकांनी सांगितले की, आरोपी दीपक येथे राहत नसून कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा.मात्र, आमचे पोलीस पथक आरोपीचा शोध घेत राहिले.

हे ही वाचा:

नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मुंबई पोलिसांना धमकीचा फोन!

२२ जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करूयात!

ठाण्यात रेव्ह पार्टी उधळली; १०० तरुणांना घेतलं ताब्यात

गोव्यात काँग्रेस, ‘आप’ला सनातन धर्माची चिंता!

दरम्यान, पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपीच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक मिळाला.त्यानंतर आरोपी दीपक हा पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे राहत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी सापळा टाकता आरोपी दीपक भिसेला नालासोपारा येथून अटक करण्यात आली.आरोपी दीपक भिसे हा आपल्या कुटुंबासह नालासोपाऱ्यात स्थायिक झाला होता आणि तेथे तो झाडे तोडण्याचे कंत्राट घेत असे.

यासंदर्भात कांदिवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन साटम यांनी सांगितले की, आरोपी दीपक भिसे याला अटक करण्यात आली असून आता तो ६२ वर्षांचा आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा