उत्तर मेक्सिकोमध्ये एका पार्टीत घुसून तिघा बंदुकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात दोन अल्पवयीन मुलांसह सहा जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या तिघा हल्लेखोरांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात २६ जण जखमीही झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
उत्तर मेक्सिकोमधील सीमेजवळच्या सोनोरो राज्याच्या सीमेवरील सिउडाड ओब्रेगॉन शहरात बंदुकधाऱ्यांनी हा हल्ला केला. बंदुकधाऱ्यांच्या या हल्ल्यात १८ वर्षांखालील दोन मुलेही मारली गेली आहेत. तसेच, पाच लहान मुले जखमी झाली आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, अन्य १३ जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडून दिले असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली.
हे ही वाचा:
मोदींनी मीरा मांझींच्या हातचा चहा प्यायल्यावर त्या म्हणाल्या, माझा देव घरी आला!
बाळासाहेबांच्या वक्तव्याचा आधार घेऊन बाबरी पतनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न
जय श्री राम: पंतप्रधान मोदींनी १९९२ मध्ये हाती घेतलेला संकल्प अखेर पूर्ण!
मराठवाड्याची लेक करणार नव्या जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य
हत्येच्या आणि अन्य गुन्ह्यांसाठी हव्या असलेल्या आरोपीवर हा हल्ला करण्यात आला, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांच्या हल्ल्यात तो मारला गेला. तीन बंदुकधारी हल्ला करण्याच्या उद्देशाने पार्टीमध्ये घुसले होते. तर, चौथा बंदुकधारी आधीच पार्टीला हजर होता, असे पोलिसांनी सांगितले. सर्व हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे पोलिस आता या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.