25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषअयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Google News Follow

Related

अयोध्येत नव्याने साकारत असलेल्या विमानतळाला ‘रामायण’ या महाकाव्याचे लेखक असणाऱ्या महर्षि वाल्मिकींचे नाव दिले जाणार आहे. ३० डिसेंबर रोजी उद्घाटन होणाऱ्या विमानतळाला ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्याधाम’ हे नाव दिले जाणार आहे. या विमानतळाला आधी ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे संबोधले जात होते.

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी, २०२४ रोजी होणार आहे. त्याआधी अयोध्येत नव्याने साकारत असलेल्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबरला होईल. उद्घाटनाच्या दिवशी इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे पहिले विमान येथून उड्डाण करेल. या दोन्ही हवाई वाहतूक कंपन्यांनी याआधीच जानेवारी २०२४पासून दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादहून अयोध्येला जाणाऱ्या विमानांची घोषणा केली आहे.

विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाचा खर्च एक हजार ४५० कोटी रुपये आहे. नवीन विमानतळाची इमारत सुमारे साडेसहा हजार चौरस मीटरवर पसरली असून गर्दीच्या वेळी सुमारे ६०० प्रवासी राहू शकतील, अशी क्षमता आहे. तर वर्षाला १० लाख प्रवासी येथून येऊ-जाऊ शकतील, त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा असतील, अशा प्रकारे येथे सोयीसुविधा आहेत.तर, विमानतळविकासाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० हजार चौरस मीटरवर पसरलेल्या नव्या टर्मिनल इमारतीचे काम केले जाईल. या इमारतीची क्षमता गर्दीच्या वेळी तीन हजार प्रवासी तर, वर्षाला ६० लाख प्रवाशांची आहे.

हे ही वाचा:

ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही सीट निवडून आणू शकत नाही

लल्लन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीश कुमारांची नियुक्ती!

भारतीयांची फाशी रद्द होणे म्हणजे भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय

जुन्या फायली, खराब झालेली उपकरणे, जुन्या गाड्यांतून बाराशे कोटींची कमाई

राम मंदिराचे प्रतीक
राम मंदिराची ऊर्जा नवीन विमानतळामध्ये प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रावणाचा पराभव करून विजयी राम अयोध्येत परततात, या संकल्पनेच्या आधारे हे विमानतळ बांधले जात आहे. विमानतळावरून येणार्‍या आणि निघणार्‍या सर्व प्रवाशांना या पवित्र ठिकाणाची जाणीव करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

छतांवर ‘शिखरे’
टर्मिनल इमारतीचे छत वेगवेगळ्या उंचीच्या शिखरांनी सुशोभित करण्यात आले आहे. ज्यायोगे संरचनेच्या भव्यतेवर जोर देण्यात आला आहे. या वैविध्यपूर्ण शिखरांसोबत, टर्मिनलमध्ये रामायण महाकाव्यातील महत्त्वाच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केलेल्या आणि चितारलेल्या चित्रांचे स्तंभ आहेत.

रामाची कथा दृश्यरूपात
विमानतळाच्या पॅसेजमधून चालणे हादेखील रामभक्तांसाठी तल्लीन करणारा अनुभव असेल. येथे ठिकठिकाणी चित्रांमधून रामायणातील कथेतील दृश्ये चितारण्यात आली आहेत. तर, टर्मिनलच्या काचेच्या दर्शनी भागावर अयोध्येच्या राजवाड्याचे वातावरण पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

१८ विमानांच्या पार्किंसगसाठी जागा
पहिल्या टप्प्यात E B-७७७ प्रकारचे विमान, एक समांतर टॅक्सी ट्रॅकसाठी तीन हजार ७५० मीटरपर्यंत धावपट्टीचा विस्तार केला जाणार आहे. शिवाय, १८ विमाने उभी राहू शकतील, इतकी जागाही विमानतळावर असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा