भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नवीन थीम गाणे रिलीज केले आहे.’फिर आयेंगे मोदी’ ( मोदी पुन्हा येतील) असे या गाण्याचे बोल आहेत.या गाण्याद्वारे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होऊन ‘मोदी पुन्हा येतील’ असा दावा केले जात आहे.भाजप पक्षाकडून गुरुवारी हे गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.२०२४ पासून आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा उल्लेख या गाण्यामध्ये केला आहे.याशिवाय राम मंदिर उभारणी, कलम ३७० हटवण्याचा निर्णयासह अनेक मोठ्या गोष्टींचा समावेश या गाण्यात करण्यात आला आहे.तसेच गाण्याद्वारे काँग्रेस पक्षावर देखील निशाणा वाढण्यात आला आहे.
गाण्याचे बोल आहेत, ‘वाजेल डंका, कामातील दमाचा’! ‘प्रभू रामजी देतील बुद्धी, मग येतील मोदी’.मोदी एक व्यक्ती नाहीत, ते देशाचा सन्मान आहेत, १४० कोटी जनतेच्या आशेची किरण आहे.मोदी पुन्हा येतील, मोदी पुन्हा येतील, असे गाण्याचे बोल आहेत.
या गाण्याच्या माध्यमातून भाजपने विरोधीपक्ष इंडी आघाडी विशेषतः काँग्रेसवर निशाणा साधला आहे.सुमारे १० मिनिटाचे हे गाणे आहे.या गाण्याच्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे दोन माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इंडी आघाडीतील अनेक नेत्यांच्या फोटोचा समावेश करण्यात आला आहे.गाण्याच्या बोलानुसार, ‘कितना भी चाहे झूठ फैला लें, मिलकर सारे घमंडी! फिर आयेगा मोदी!
हे ही वाचा:
कॅनडामधील हिंदू मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर १४ गोळ्या झाडल्या
पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात एनएसजी कमांडोसह पाच हजार पोलीस तैनात!
अबूधाबीच्या हिंदू मंदिराचे मोदी करणार उद्घाटन
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दादरच्या दुकानदारांवर बडगा!
व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी नवीन संसद भवनात सांगोलची स्थापना करताना, भारतीय वायुसेनेच्या विमानात उड्डाण करताना, मेट्रोमध्ये प्रवास करताना आणि वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करताना दिसत आहेत.पक्षाकडून विशेषतः व्हिडिओमध्ये, कलम ३७० हटवणे, उज्ज्वला योजना,प्रत्येक घराला पाणी, जन धन योजना,किसान सन्मान निधी, मोफत धान्य, आयुष्मान कार्डसह अनेक योजनांचा उल्लेख केला आहे.
सर्वेक्षणात भाजपची आघाडी:
काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एबीपी सीवोटर सर्वेक्षणातही २०२४ मध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.सर्वेक्षणानुसार,भाजप/एनडीएला ४२ टक्के मतांसह २९५ ते ३३५ जागा मिळू शकतात.तर काँग्रेस/ इंडी आघाडीला १६५ ते २०५ जागा मिळू शकतात.तसेच इतरांना ३५ ते ६५ जागा मिळतील असा अंदाज होता.