पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलेल्या २३ जागांच्या मागणीला काँग्रेसने विरोध केला आहे.शिवसेना उबाठा गटाने जर २३ जागा घेतल्या तर काँग्रेसकडे काय असणार असा सवाल देखील काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे.
आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष कंबर कसत आहेत.भाजप विरोधात इंडी आघाडीच्या बैठका पार पडत आहेत.मात्र, इंडी आघाडीतील पक्षातच अस्थिरता असल्याचे चित्र दिसत आहे.मागील काही दिवसांपूर्वी इंडी आघाडीच्या बैठकीत शिवसेना उबाठा गटाने २३ जागांवर दावा केला होता.गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या गटाच्या उमेदवारांनी अनेक जागा जिंकल्या होत्या, मात्र आता बहुतांश उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत.
हे ही वाचा:
दहशतवादी हाफिज सईदला आमच्या स्वाधीन करा!
पुण्यात दोन गॅंगनी एकमेकांविरोधात उगारले कोयते!
चॅट जीपीटीला रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे ‘भारत जीपीटी’ देणार टक्कर
ठाकरे गटाच्या २३ जागांच्या मागणीवर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, शिवसेना उबाठा गटाने जर २३ जागा घेतल्या तर काँग्रेसकडे काय असणार. पक्षाच्या विभाजनामुळे शिवसेनेकडे पुरेसे उमेदवार नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठे आव्हान आहे, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितले.आपल्या सर्व पक्षांनी एकजूट होऊन पुढे लढा दिला पाहिजे.जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चेच्या तीन-चार फेऱ्या होतील असे देखील संजय निरुपम म्हणाले. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर काँग्रेस हा राज्यातील सर्वात जुना पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील यावर प्रितिक्रिया दिली.ते म्हणाले की, पक्षांमध्ये समायोजनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक पक्षाला जागांचा मोठा वाटा हवा असला तरी सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेची २३ जागांची मागणी खूपच जास्त आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.