28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषइस्रो आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार

इस्रो आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार

अशी मोहीम आखणारा भारत दुसराच देश

Google News Follow

Related

भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) यंदाच्या वर्षात अनेक यशस्वी मोहिमा करून भारताचे नाव जगभरात उंचावले आहे. चांद्रयान-३, आदित्य एल वन अशा अनेक मोहिमा इस्रोने पार पाडल्या. यानंतर २०२४ च्या पहिल्याच दिवशी इस्रो आपली पुढची मोहीम लाँच करणार आहे. ब्लॅक होल्स म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो ‘एक्सपोसॅट मिशन’ लाँच करणार आहे.

इस्रोने यासंदर्भात एक्सवर माहिती दिली आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, हे देशाचं पहिलंच एक्स-रे पोलारीमीटर सॅटेलाईट (एक्सपोसॅट) असणार आहे. १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी ही मोहीम लाँच होईल. यासाठी इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे.

एक्सपोसॅट मोहीमेचे उद्दिष्ट हे विश्वातील सर्वाधिक चमकदार अशा ५० प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करणे आहे. यामध्ये पल्सर्स, ब्लॅक होल एक्स-रे बायनरीज, अ‍ॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लेई, न्यूट्रॉन स्टार्स आणि नॉन थर्मल सुपरनोव्हा अवशेष यांचा समावेश आहे. एक्सपोसॅट उपग्रह हा पृथ्वीच्या खालच्या वर्तुळाकार कक्षेत स्थिरावण्यात येईल. तो ५०० ते ७०० किलोमीटर त्र्यिज्येत पृथ्वीभोवती फिरेल. कमीत कमी पाच वर्षे तो अंतराळाचा अभ्यास करणार आहे.

या मोहिमेंतर्गत दोन पेलोड पाठवण्यात येणार आहेत. यात POLIX हे उपकरण पोलरायझेशनचे पॅरामीटर मोजण्याचं काम करेल. सोबतच पोलरायझेशनचे डिग्री आणि अँगलही ते तपासणार. तर XSPECT हे उपकरण ०.८ ते ०.१५ केव्ही एनर्जी रेंजमधील स्पेक्ट्रोस्कोपिक माहिती देईल.

ही उपकरणे रामन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि यूआर राव सॅटेलाईट सेंटरने मिळून तयार केली आहेत. एक्सपोसॅट ही जगातील दुसरीच अशी मोहीम आहे. यापूर्वी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने २०२१ साली इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर लाँच केलं होतं. या मोहिमेमुळे ब्रह्मांडाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता असून अनेक रहस्य उलगडली जाऊ शकतात.

हे ही वाचा:

धुक्याच्या विळख्यामुळे उत्तर भारतात शाळांना सुट्टी

युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज

येरुणकर हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या ज्वेलर्ससह दोन जण अटकेत

वर्ल्ड कप फायनलमध्ये जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्यातून बेंच, जॅकेट

दरम्यान, भारताची पहिली सौरमोहीम देखील यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. ‘आदित्य’ हे यान ६ किंवा ७ जानेवारी रोजी एल- वन या पॉइंटवर पोहोचणार आहे. याठिकाणी प्रस्थापित झाल्यानंतर ते सूर्याचा अभ्यास सुरू करेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा