छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल झालेल्या सुरक्षा बल आणि नक्षल्यांच्या चकमकीत २० जवान हुतात्मा झाले. शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर अचानक हल्ला केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे वीस जवान हुतात्मा झाले.
या हल्ल्याला काहीच तास उलटून गेल्यावर सोशल मिडियामधून अपप्रचार आणि दुष्प्रचाराला सुरवात झाली. जगत पुजारी नावाच्या एका भाजपाच्या नेत्याला या हल्ल्याच्या प्रकरणी अटक झाल्याच्या खोट्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या. दंतेवाडामधील माजी आमदाराचा मुलगा आणि भाजपाचा जिल्हा उपाध्यक्ष हा या प्रकरणात सामील आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या.
त्याबद्दलचे काही फोटो आणि वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्याही शेअर केल्या जात होत्या. परंतु या सर्व बातम्या आणि सर्व फोटो खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे. इंडिया टुडेने केलेल्या ‘फॅक्ट चेक’मधून हे समोर आलं आहे की या सर्व बातम्या आणि फोटो हे बनावट असून त्याचा भाजपा नेत्याशी काहीही संबंध नाही.
२०२० मध्ये जगत पुजारी आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली होती. यामध्ये जगत पुजारीने माओवाद्यांना ट्रॅक्टर पुरवण्यासाठी मदत केली असल्याचा आरोप त्याच्यावर होता. या अटकेची बातमी त्याचवेळी अनेक वृत्तपत्रांनी केली होती. त्याच बातमीतील हा भाग नुकत्याच झालेल्या नक्षली हल्ल्यात जोडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केला जात आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, वाझेच्या कथित पत्रात गौप्य्स्फोट