भारताची माजी ॲथलिट अंजू बॉबी जॉर्जने केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. या वर्षभरात कुस्तीगीरांनी केलेल्या आंदोलनातून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. सरकारकडून कुस्तीगीरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही केला गेला. पण अंजू जॉर्जने केलेल्या वक्तव्यामुळे हे सरकार खेळाडूंप्रती सहकार्याची भावना ठेवणारे आहे, असा निष्कर्ष काढण्यात येत आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ख्रिस्ती समुदायाने पंतप्रधानांची भेट घेतली. या कार्यक्रमात मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले. यावेळी अंजू जॉर्जही उपस्थित होती. तिने छोटेखानी भाषण केले आणि पंतप्रधानांची स्तुती केली.
अंजू जॉर्ज म्हणाली की, मी जेव्हा खेळत होते तो काळ माझ्यासाठी चुकीचा होता. मी जेव्हा २० वर्षांपूर्वी पहिले जागतिक पदक जिंकले तेव्हा मी जिथे नोकरी करत होते, त्यांनी मला बढती देण्यास चालढकल केली. मी चुकीच्या काळात होते. अंजू जॉर्जने एकप्रकारे तत्कालिन यूपीए सरकारच्या कारभारावर टीका केली. खेळाडूंसाठी या सरकारने काही केले नाही, अशी अंजू जॉर्जची तक्रार होती.
हे ही वाचा:
अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांचा वाजणार शंख!
सिने समीक्षक के. आर. के ला मुंबईत अटक
सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांबद्दल राहुल गांधी गप्प का ? बीआरएसच्या के. कविता यांचा सवाल
इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार
अंजू म्हणाली की, एक खेळाडू म्हणून मी गेली २५ वर्षे खेळातील घडामोडी जवळून पाहात आहे. आधीच्या तुलनेत आता खूपच बदल झाले आहेत. नीरज चोप्राने पदक जिंकल्यावर तर खूप बदल झाले. ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी तो आनंद साजरा केला ते पाहता मला थोडा हेवा वाटू लागला. मला वाटत होते की, मी खेळाच्या चुकीच्या काळात होते.
आता देशात क्रीडा क्षेत्राबद्दल खूप चर्चा होते. खेलो इंडिया, फिट इंडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. आमच्या काळात एखाद दोन खेळाडू असत. आता अनेक खेळाडू आहेत. हे सगळे आपल्या (पंतप्रधान मोदी) नेतृत्वामुळे शक्य झाले. महिला सशक्तिकरण हे केवळ चमकदार वाक्य राहिलेले नाही. तर आता मुली स्वप्न पाहतात. त्यांना ठाऊक असते की, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. आपण २०३६चे ऑलिम्पिक आयोजित करण्याचे स्वप्न पाहात आहोत, अशा शब्दांत अंजूने पंतप्रधानांची प्रशंसा केली.
अंजूने २००३च्या पॅरिस जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत इतिहास रचला होता. लांब उडीत तिने ब्राँझ जिंकले होते. त्यावेळी तिने ६.७० मीटर उडी मारली होती.