अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख अगदी जवळ आली आहे.राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे.या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील नागरिकांना अक्षता वाटण्याचा उपक्रम सुरु झाला आहे. तसाच उपक्रम मुंबई उपनगरातील बोरिवली येथे सोमवारी २५ डिसेंबर रोजी राबवण्यात आला होता.
बोरिवलीतील वसंत मार्वल कॉम्प्लेक्स येथे अयोध्येतून आलेला अक्षता कलश आणि संत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी सकाळी ९ वाजता वसंत मार्वल कॉम्प्लेक्स येथील श्री राम कृष्ण मंदिरापासून या यात्रेची सुरुवात होऊन कांदिवलीतील क्लेरियन, भव्य, ग्रेस बिल्डिंग मार्गे सनटेक बिल्डिंग येथे थांबली.
हे ही वाचा:
गिर्यारोहिका शर्विकाने सहाव्या वर्षी १०० किल्ले सर करत रचला विक्रम
इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार
चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!
अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली
परिसरातील सर्व भाविकांनी अक्षता कलश व संत यात्रेचे भव्य स्वागत केले.किशोर बन्सल, संजय आनंद आणि मुलांनी कलश यात्रेच्या मार्गावरून नमस्कार केला.कलश यात्रेत महिलांनी विशेष भूमिका बजावली.यात्रेत सर्व महिला मोठ्या आवेशात आणि उत्साहाने प्रभू रामाचा जयघोष करत, प्रभू रामाची गाणी गात पुढे सरकत होत्या.तसेच या संत यात्रेदरम्यान सर्व राम भक्तांसाठी सनटेक बिल्डिंग सोसायटीतर्फे चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
या उपक्रमांतर्गत स्थानिक रहिवाशांना १ जानेवारी २०२४ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत घरोघरी जाऊन अक्षता वाटून अयोध्येला येण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.
दरम्यान, ५०० वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आणि लाखो राम भक्तांच्या बलिदानानंतर अखेर अयोध्येत प्रभू राम विराजमान होणार आहेत.अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.