25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरराजकारणकर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना  

कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना  

राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्या सूचना

Google News Follow

Related

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हिजाब संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात लागू केलेली हिजाबवरील बंदी उठवण्यात येणार आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाबवरील बंदी उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना देताना सिद्धरामय्या म्हणाले, “प्रत्येकाला त्याच्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे.” या आधीच्या बसवराज बोम्मई सरकारने कर्नाटकमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यास बंदी घातली होती. परंतु, सिद्धरामय्या यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बंदी उठवण्याचे निर्देश दिले आहेत.

हिजाबवरील बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान मोदी यांची ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा फसवी आहे. भाजपा कपड्यांवरून आणि जातीपातींवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा परीक्षांमध्ये मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास कर्नाटक सरकारने परवानगी दिली होती. “भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे लोकांना हवे तसे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे”, असं म्हणत कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर यांनी हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली होती. तेव्हापासूनच कर्नाटकमधील हिजाबवरील बंदी उठवली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर सिद्धरामय्या यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी ही बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर केला.

हे ही वाचा:

खलिस्तान समर्थकांकडून अमेरिकेतील हिंदू मंदिरावर मोदींविरोधात लिहिला आक्षेपार्ह मजकूर

प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन!

बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करणार

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदच्या जागेचा लिलाव!

फेब्रुवारी २०२२ मध्ये कर्नाटकमधील उडुपीमध्ये एका महाविद्यालयात हिजाब घातलेल्या काही विद्यार्थीनींना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर राज्यात अनेक शैक्षणिक संस्थांनी हिजाबवर बंदी घालण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ तत्कालीन बसवराज बोम्मई सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. त्यावेळी बोम्मई म्हणाले होते की, देशातील समानता, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेसमोर अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही पोशाखाला मंजुरी दिली जाणार नाही. बोम्मई सरकाच्या या निर्णयानंतर राज्यात अनेक मुस्लीम संघटनांसह काँग्रेसने निदर्शने केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा